AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीनिधनानंतर विम्याच्या रकमेसाठी महिलेचा सासरी छळ, गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न

मृत पतीच्या विम्याचे पैसे आणि पीएफमधील दहा लाख रुपये पत्नीने सासरच्या मंडळींना द्यावे, यासाठी या महिलेला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातो.

पतीनिधनानंतर विम्याच्या रकमेसाठी महिलेचा सासरी छळ, गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न
सासरच्या मंडळींनी सूनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 4:27 PM
Share

लासलगाव : येवला तालुक्यातील महालखेडा येथील विधवा महिलेचा सासरी छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर विम्याच्या रकमेसाठी सासरच्या मंडळींकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप होत आहे.

नेमकं काय घडलं?

मृत पतीच्या विम्याचे पैसे आणि पीएफमधील दहा लाख रुपये पत्नीने सासरच्या मंडळींना द्यावे, यासाठी या महिलेला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातो. तिचा गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील महालखेडा या गावी घडली.

रस्त्याच्या कडेला फेकून दिले

धक्कादायक म्हणजे मारहाण करून बेशुद्ध झालेल्या महिलेला मृत समजून कारने घेऊन जाण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. या घटनेची माहिती समजताच पीडित महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी तिला येवल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या महिलेने येवला पोलिसांत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार करण्यात आली. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरच्या मंडळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कल्याणमध्ये घराबाहेर काढलेली महिलेला पुन्हा सासरी

दरम्यान, कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून एक विवाहित महिला तिच्या तीन मुलांसह 18 दिवस घराबाहेर राहत असल्याचा प्रकार गेल्या वर्षअखेर समोर आला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित महिलेच्या मदतीसाठी पाठवले होते. पोलिसांनी आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवला. त्यानंतर महिलेच्या सासऱ्याने तिला आपल्यासोबत घरी राहण्यास अनुमती दिली होती.

संबंधित बातम्या :

सासरच्यांनी लेकराबाळांसह घराबाहेर काढलं! 15 दिवसांचा वनवास भोगलेल्या महिलेच्या मदतीला सोमय्या धावले

संतापजनक ! पैशांसाठी सासऱ्याने सूनेला चक्क 80 हजारात विकलं, मुलाला माहिती पडलं आणि….

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.