टेरेसवर वृद्धेला एकटीला गाठले, मालेगावात दीड लाखांचे दागिने लुटून तिघे पसार

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सोयगाव कॉलेज रोडवरील सत्यम अपार्टमेंटमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन चोरांनी चोरी केल्याचं समोर आलं आहे.

टेरेसवर वृद्धेला एकटीला गाठले, मालेगावात दीड लाखांचे दागिने लुटून तिघे पसार
मालेगावात धाडसी चोरी
Image Credit source: टीव्ही 9
मनोहर शेवाळे

| Edited By: अनिश बेंद्रे

May 09, 2022 | 7:15 AM

मालेगांव : भरदिवसा धाडसी चोरीचा (Theft) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात (Nashik Malegaon) ही घटना घडली. धाक दाखवून वृद्ध महिलेची लूट करण्यात आली. महिलेचे लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला (Gold Ornaments Loot) गेल्याचा आरोप केला जात आहे. महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून चोरटे पसार झाले. मालेगाव शहरातील कॉलेज रोडवर हा धाडसी चोरीचा प्रकार घडला. एका बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन चोरांनी चोरी केल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सोयगाव कॉलेज रोडवरील सत्यम अपार्टमेंटमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन चोरांनी चोरी केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, पोत आणि बांगड्या हिसकावले. त्यानंतर तिघांनी भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना घडली.

नेमकं काय घडलं?

महिला तिच्या बिल्डिंगच्या टेरेसवर एकटी असताना हा प्रकार घडला. तिथे आलेल्या अज्ञात तीन इसमांनी महिलेला धाक दाखवत तिच्या गळ्यातील आणि हातातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें