नवी मुंबईत बायकोची हत्या, नाशिकला जाऊन विषप्राशन, बायकोच्या माहेरच्यांनीच नवऱ्याला नेलं रुग्णालयात

| Updated on: Dec 04, 2021 | 1:30 PM

बायकोची हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नाशिकला जाऊन विष प्राशन करत त्याने स्वतःचंही आयुष्यही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या नातेवाईकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

नवी मुंबईत बायकोची हत्या, नाशिकला जाऊन विषप्राशन, बायकोच्या माहेरच्यांनीच नवऱ्याला नेलं रुग्णालयात
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी मुंबई : घरगुती वादातून दारुड्या नवऱ्याने आपल्या बायकोची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर नवऱ्याने नाशिकला जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नवी मुंबईत हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बायकोच्या माहेरच्यांनीच नवऱ्याला रुग्णालयात नेलं.

कविता वाघ असं 30 वर्षीय मयत विवाहितेचं नाव आहे. नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांनी पती रमेश वाघ याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कविता वाघ नेरुळ सेक्टर 10 मध्ये पती आणि दोन मुलांसोबत राहत होती.

काय आहे प्रकरण?

आरोपी पती रमेश वाघ याला मद्यपान करण्याचं व्यसन होतं. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरुन दोघांमध्ये जवळपास दररोजच वाद होत असत. हत्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी त्यांची दोन्ही मुलं नातेवाईकांच्या घरी गेली होती. या संधीचा फायदा घेत रमेशने पत्नी कविताचा गळा दाबून निर्घृण खून केला.

नाशिकला जाऊन विष प्राशन

बायकोची हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नाशिकला जाऊन विष प्राशन करत त्याने स्वतःचंही आयुष्यही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र कविताच्या नातेवाईकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

पत्नीचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू

दुसरीकडे कविताच्या बहिणीने नेरुळ गाठून पोलिसांच्या मदतीने कविताला रुग्णालयात नेलं. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

आरोपी नवरा रुग्णालयात

गुरुवारी रात्री उशिरा नेरुळ पोलिसांनी आरोपी रमेश वाघ याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नाशकातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलीस आरोपी रमेश वाघला नाशिकमधून अटक करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘वैरीण माते’ने हत्येची कारणं सांगितली

कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला