ताई-भावोजींचं भांडण, पण हल्ला थेट मेव्हण्यावर! कटरने वार, हवेत गोळीबार, मालेगावात थरार

मेव्हण्यावर भावोजींनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं कारण काय?

ताई-भावोजींचं भांडण, पण हल्ला थेट मेव्हण्यावर! कटरने वार, हवेत गोळीबार, मालेगावात थरार
हल्ला झालेलं ठिकाणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 11:52 AM

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : नवरा-बायकोच्या (Husband Wife Disput) भांडणाचा राग मेव्हण्यावर निघाल्याची घटना उघडकीस आलीय. मालेगावात एकाने आपल्या बायकोच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मेव्हणा गंभीर जखमी झालाय.  जखमी मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या मालेगाव (Malegaon) पोलिसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कटरने हल्ला (Attempt to murder) करण्यात आला होता. शिवाय यानंतर हल्लेखोरांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केल्याचं सांगितलं जातंय.

मालेगावच्या सर्वे क्रमांक 55च्या निहाल नगर भागात ही थरारक घटना घडली. पत्नी-पत्नीच्या कौटुंबिक वादातून शालकाने मेव्हण्यावर कटरने हल्ला केला. या हल्ल्यात मेव्हणा गंभीररीत्या जखमी झाला.

भावोजींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेव्हण्याचं नाव सरताज सत्तार शेख असं आहे. सरताजला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, भावोजींनी मेव्हण्यावर हल्ला घडवून आल्याचा आरोप केला जातोय. या जीवघेण्या हल्ल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या जमावाला पांगवण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत गोळीबार देखील केल्याचं लोकांचं म्हणणंय.

एक जिवंत तर एक फायर केलेलं काडतूस कव्हर केल्याचं फोटोही व्हायरल झालेत. मालेगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय. हल्लेखोरांविरोधात मालेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातचं काम सुरु होतं.

खरंच गोळीबार झाला की नाही, याचा तपास पोलिसांनी केला जातोय. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. संपूर्ण तपासाअंती गोळीबार प्रकरणाचाही गुन्हा दाखल करण्यात येईल, असं वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

मेव्हण्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय. काही काळ मालेगावच्या सर्वे नंबर 55 च्या निहाल नगर भागात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पाहणी करुन पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.