Malegaon Crime : मालेगाव हादरलं! नवरा बायको यांच्या संशयास्पद मृत्यूचं कारण काय?

मालेगाव पोलिसांसमोर नवरा बायकोच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान

Malegaon Crime : मालेगाव हादरलं! नवरा बायको यांच्या संशयास्पद मृत्यूचं कारण काय?
मालेगावात नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 11:00 AM

मालेगाव : मालेगाव (Malegaon News) येथील हिंगलाजमध्ये नवरा बायकोचा संशयास्पद मृत्यू (Malegaon Crime News) झालाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आलीय. या संशयास्पद मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. या दाम्पत्याची कुणी हत्या (Murder) केली? की त्यांच्यासोबत आणखी भलतंच काही घडलंय का, याचा छडा लावण्याच्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत.

अलताब हुसेन मोहम्मद सईद आणि अल्कमा अलताब हुसेन हे दाम्पत्या हिंगलाज नगर इथं राहत होते. पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये अल्कमा अलताब हुसेन या महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलाय. त्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर अल्कमाचा पती अलताब याच्या डोक्याला मार लागल्याचं दिसून आलंय. या दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली जाणार असून त्यातून नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

संशयास्पदरीत्या मृत्यू झालेलं दाम्पत्य वयस्कर असून ते एकटेच घरात राहत होते. घरातच त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांकडून पुढील चौकशी केली जातेय. लुटमारीच्या उद्देशाने तर त्यांच्यावर हल्ला करत खून करण्यात आला नाही ना, अशीही शक्यता वर्तवली जातेय. मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता या संशयास्पद मृत्यूप्रकरणी झालेली नाही.

पोलिसांच्या तपासातून या मृत्यूप्रकरणी सखोल तपास केला जातोय. आजूबाजूच्या परिसरातील लोकांची चौकशी, हत्या किंवा घातपाताच्या सर्व शक्यताही पोलिसांकडून पडताळल्या जात आहेत. त्या चौकशीतून नेमकी आता काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.