नाशिक-मुंबई हायवेवर भीषण अपघात, कांदिवलीतील तरुण जागीच ठार! कसा घडला अपघात?

राज्यातील अपघातांचं सत्र कधी थांबणार? आणखी एक तरुण रस्ते अपघातात जागीच ठार

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण अपघात, कांदिवलीतील तरुण जागीच ठार! कसा घडला अपघात?
पुन्हा भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 10:51 AM

इगतपुरी : राज्यातील अपघाताचं सत्र कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुन्हा एकदा समोर आलीय. मध्यरात्री नाशिक मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway Accident) भीषण अपघात झाला. मंगळवारी पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune Bengaluru Highway) झालेल्या अपघातासारखाच अपघात नाशिक मुंबई हायवेवर झाल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगर कांदिवली (Kandivali News) येथील तरुण जागीच ठार झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य केलं. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री गोंदे फाटाजवळ कोंबडीने भरलेला पिकअपने पुढे असलेल्या एका आयशर ट्रकला मागून जबर धडक दिली. या धडकेत 22 वर्षीय तरुण राजेंद्र वर्मा याचा जागीच जीव गेला. तर मोहम्मद दिलशाद शेख, वय 29 आणि सफिक मुसुफा अहमद, वय 21, हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

या अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांच्या मदतीनं अपघातात जखमी झालेल्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

MH 47 Y 7680 क्रमांकाचा पिक अप कोंबड्या वाहून नेत होता. या पिकअप व्हॅनने MH 48 T 2022 क्रमांकाच्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात आयशर ट्रकच्या मागच्या बाजूला जबर फटका बसला. तर पिकअप वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालं.

नेमका हा अपघात कुणाच्या चुकीमुळे घडला, हे कळू शकलेलं नाही. घोटी पोलिसांनी या अपघाताची नोंद करुन घेतली. या अपघातामुळे महामार्गावर मध्यरात्री काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला केलं आणि अखेर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, पुणे बंगळुरु महामार्गावरही सोमवारी असाच अपघात घडला होता. पुढे रस्ता ओलांडणाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबला. पण मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने समोरील ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात मागील ट्रकमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामुळेही हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.