Nashik Murder CCTV : लुटमारीच्या उद्देशानं हत्या! भररस्त्यात भोसकलं, 24 तासांत दुसऱ्या हत्येनं नाशिक हादरलं!

Nashik Crime News : सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणून रस्त्याच्या कडेनं जाताना दिसतो. दरम्यान, तिघे जण बाईकवर येतात. यातील एक जण आधी उरतो. पुढे धावत जातो.

Nashik Murder CCTV : लुटमारीच्या उद्देशानं हत्या! भररस्त्यात भोसकलं, 24 तासांत दुसऱ्या हत्येनं नाशिक हादरलं!
हत्येच्या घटनेनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:29 AM

नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime News) खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये 24 तासांच्या आत आणखी एक हत्याकांड (Nashik Murder CCTV) घडलंय. लुटमारीच्या उद्देशाने आलेल्यांनी एका व्यक्तीला भररस्त्यामध्ये भोसकलं. या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लुटमारीच्या उद्देशानं आलेल्या पाच जणांच्या टोळीनं रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. यानंतर या व्यक्तीवर धारदार शस्त्रानं सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि रस्त्यातच या व्यक्तीनं जीव सोडलाय. नाशिकच्या (Nashik Police) पूर्णिमा बस स्टॉप परिसरात करण्यात आलेल्या या हत्याकांडाच्या घटनेनं संपूर्ण नाशिक परसिर हादरुन गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुजेटदेखील समोर आलंय.

कुणाची हत्या?

नाशिकमध्ये 24 तासांच दुसरं हत्याकांड घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हरीश पाटील याला भररस्त्यात भोसकण्यात आलं. दिवसभरात घडलेल्या दुसऱ्या हत्येनं नाशिक शहरातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केले जात आहे. हत्या करण्यात आलेला युवत हा पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय.

धक्कादायक घटनेचं सीसीटीव्हीही समोर

या धक्कादायक घटनेचं थरारक सीसीटीव्ही देखील समोर आलंय. नांदेडमध्ये जशी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्याचप्रमाणे बाईकवरुन येत हल्लेखोरांनी हरीश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेप्रकरणी दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : धरणात पाच जण बुडाले

हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणून रस्त्याच्या कडेनं जाताना दिसतो. दरम्यान, तिघे जण बाईकवर येतात. यातील एक जण आधी उरतो. पुढे धावत जातो. रस्त्यानं चालणाऱ्या हरीश यांच्यावर सगळ्या पहिला वार याच तरुणाकडून होतो. यानंतर मागून दोघे जण येतात. ते देखील हरीश यांच्यावर हल्ला करतात. दरम्यान, दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या एन्गलमध्ये कशाप्रकारे दबा धरुन हल्लेखोर पाठीमागून वार करतात, हे देखील कैद झालंय. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलंय.

या धक्कादायक हत्याकांड प्रकरणी आता आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. दरम्यान, गुरुवारी बापलेकानं आत्महत्यानं केल्यानं एकच खळबळ उडाली होती. नाशिकच्या पंचवटी परिसरात वडील आणि मुलानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली होती.

राहत्या घरात गळफास घेऊन बापलेकानं आत्महत्या केल्यानं नाशिक हादरलं होतं. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं आत्महत्या करणाऱ्या वडील-मुलाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचं कारण कळू शकलं नव्हतं. ही घटना जाती असतानाच आता हत्येच्या घटनेनं नाशिक हादरुन गेलंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.