Video: भाचीचं लग्न आटोपून घरी परतत असताना मामाचा मृत्यू! घोटी-सिन्नर हायवेवर ट्रकची जीपला धडक, जागीच ठार

Video: भाचीचं लग्न आटोपून घरी परतत असताना मामाचा मृत्यू! घोटी-सिन्नर हायवेवर ट्रकची जीपला धडक, जागीच ठार
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi

Nashik Ghoti Accident : आपल्या भाचीचं लग्न आटोपून घरी परतणाऱ्या भाऊसाहेब यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांचं कुटुंब पोरकं झालंय.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: सिद्धेश सावंत

May 29, 2022 | 7:39 AM

नाशिक : घोटी-सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात (Road Accident) झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात 40 वर्षीय भाऊसाहेब शांताराम टोचे यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने भाऊसाहेब यांच्या जीपला जोरदार धडक (Nashik Accident) दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेत जीपमधून घरी परतत असलेल्या भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या जीपचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला. घोटी-सिन्नर (Ghoti Sinner Highway) हायवेवरील भरवीर फाटा इथं घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली. सिन्नरहून घोटीकडे भाऊसाहेब आपल्या जीपमधून जात होते. आपल्या भाचीचं लग्न आटोपून घरी परतणाऱ्या भाऊसाहेब यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांचं कुटुंब पोरकं झालंय. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ट्रकचालक फरार

अपघातानंतर ट्रकचालक फरार झालाय. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. पोलीस निरीक्ष दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जुंदेर, कोरडे आदी पोलीस अधिकारी या अपघातप्रकरणी तपास करत आहेत.

भाचीच्या लग्नावरुन परतताना काळाचा घाला

MH 12 AT 0677 या नंबरच्या जीपमधून 40 वर्षीय भाऊसाहेब शांताराम टोचे हे आपल्या भाजीच्या लग्नाला गेले होते. लग्नसमारंभ आटोपून ते घरी जाण्यासाठी निघालेले. वाटेतच काळानं घाला घातला. ट्रकच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये जीपचा चक्काचूर झालाय.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे टोपे परिवार पोरका झालाय. टोचे यांची आई, पत्नी दोन मुलं आणि मुलगी परिवार यांच्यावरील छत्र हरपलंय. या अपघातामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें