VIDEO : हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

चित्रपटांमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्याची घटना आपण बघितली आहे. मात्र, नाशिकमध्ये वास्तव्यात अशी भयानक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VIDEO : हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद
नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

नाशिक : चित्रपटांमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्याची घटना आपण बघितली आहे. मात्र, नाशिकमध्ये वास्तव्यात अशी भयानक घटना समोर आली आहे. तरुण आरोपीने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संबंधित घटना ही मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ही संबंध घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना रामसेतू पूल परिसरात संबंधित मृतदेह आढळला. त्यानंतर संबंध प्रकार उघडकीस आला.

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात दोन हत्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा नाशिक हत्येच्या घटनेने हादरलं आहे. एका नराधमाने आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना रात्री जवळपास तीन वाचजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद झाला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हत्येचा थरार

या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं अनिल गायधनी असं नाव आहे. ते हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. सर्व सुरुळीत सुरु होतं. पण अचानक आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्यांचा मृतदेह दिसला.

पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर इतर अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हत्या झाली तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील कुणी काही बघितलं का? मृतक व्यक्ती नेमकं कोण आहे? याची माहिती पोलिसांनी मिळवली.

सीसीटीव्हीत संबंध घटना कैद

अनिल गायधनी यांचा मृतदेह राजहंस दुकानाजवळ आढळला होता. त्या दुकानाबाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपी सीसीटीव्हीत अनिल यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण करताना दिसत होता.

पोलिसांकडून आरोपीला अटक

पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत या प्रकरणी संशयित आरोपी शुभम मोरे याला ताब्यात घेतलं. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. आरोपीच्या वडिलांचा भेळचा व्यवसाय आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात याआधी झालेल्या भांडणातून त्याने हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पण याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप जारी करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

‘घटस्फोट दे, नाहीतर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करेन’, राक्षसी पतीकडून धमकी, मुंबईतील संतापजनक घटना

डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI