नाशकात चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या, सातपूरजवळ सराफा व्यावसायिकाला जबर मारहाण, लाखो रुपयांची लूट

नाशिकमधील सातपूर जवळील गंगासागर नगर मधील सराफा व्यवसायिकाची रात्रीच्या सुमारास जबरी मारहाण करून लाखो रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

नाशकात चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या, सातपूरजवळ सराफा व्यावसायिकाला जबर मारहाण, लाखो रुपयांची लूट
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 4:46 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये चोरी आणि लुटमरीच्या घटना वाढत आहेत. नुकतीच सातपूर जवळील गंगासागर नगर मधील सराफा व्यवसायिकाची रात्रीच्या सुमारास जबरी मारहाण करून लाखो रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. (theft Incidents increased in Nashik, robbery of lakhs of rupees by beating a bullion trader near Satpur)

गंगासागर नगर मध्ये श्री यमाई माता ज्वेलर्स या नावाने महेश दिलीप टाग यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. महेश हे नेहमी प्रमाणे रात्रीच्या सुमारास दुकानातील सोन्याच्या किंमती वस्तू व रोख रक्कम बॅग मध्ये भरून दुकान बंद करून आपली दुचाकीने घरी जात होते. याच दरम्यान श्रमिकनगर मधील नाल्या जवळ आसपास कोणी नसल्याचा फायदा घेत नजर ठेवून असलेले चार चोरटे पल्सर गाडी वर येऊन महेश यांच्या गाडीला मागून येऊन पुढे आडवे झाले. फावडे, कोयता आणि धारदार शस्त्रांनी त्यांनी महेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महेश यांनी विरोध केला असता डोक्यात व हातावर गंभीर दुखापत करून चोरांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावली आणि त्यांनी तिथून पळ काढला.

सदर संशयित चोरटे गेल्या आठ दिवसांपासून सोनाराच्या हालचालींवर नजर ठेवून होते. सगळी माहिती घेऊन त्यांनी हा प्रकार केला असल्याचा संशय सातपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या हल्ल्यात महेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोने आणि रोख रक्कम किती होती याबाबतची माहिती अजून मिळालेली नसून या प्रकरणात अधिक तपास पोलीस करत आहेत.

नाशकात कोयता गँगची दहशत

शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीनं डोकं वर काढलं आहे. शहरात सध्या कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. नाशिक रोडच्या मुक्तीधाम परिसरात काहीजण कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून दुकानदारांकडून पैसे वरुली करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान या कोयदा गँगची दहशत सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालीय. कोयता गँगच्या दहशतीमुळे इथले दुकानदार हैराण झाले आहेत. मात्र, पोलिसांकडून या गुंडांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

नाशिक रोडच्या मुक्तीधाम परिसरातील दुकानदारांना कोयता गॅंगच्या दहशतीखाली राहावं लागत आहे. दर महिन्याला 2 ते 3 गुंड हातात कोयता, तलवारी आणि धारदार शस्त्र घेऊन थेट दुकानात शिरता आणि दुकानदारांना दमदाटी करून पैशाची मागणी करतात. हे गुंड शस्त्रास्त्रे घेऊन आल्यामुळे आम्हाला प्रतिकार करता येत नाही. असं इथले व्यवसायिक सांगत आहेत. विशेष म्हणजे या गुंडांकडून इथल्या व्यावसायिक महिलांनाही अश्लील शिवीगाळ करत दमबाजी करायलाही कोयदा गँगचे गुंड मागेपुढे पाहत नाहीत. दरम्यान या कोयता गॅंगच्या दादागिरीचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे पोलीस किमान आतातरी या गुंडांना पकडून पोलिसी खाक्या दाखवतील अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या

नाशिकच्या व्यावसायिकांमध्ये कोयता गँगची दहशत, गुंडांच्या दादागिरीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

पुण्यात 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार, 8 जणांना बेड्या, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

ब्रेकअपचं दुःख, मुंबईचा तरुण एक्स गर्लफ्रेण्डच्या गावात, उंच टेकडीवरुन जीव देणार तोच…

(theft Incidents increased in Nashik, robbery of lakhs of rupees by beating a bullion trader near Satpur)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.