नाशिक : शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीनं डोकं वर काढलं आहे. शहरात सध्या कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. नाशिक रोडच्या मुक्तीधाम परिसरात काहीजण कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून दुकानदारांकडून पैसे वरुली करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान या कोयता गँगची दहशत सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालीय. कोयता गँगच्या दहशतीमुळे इथले दुकानदार हैराण झाले आहेत. मात्र, पोलिसांकडून या गुंडांवर अद्याप कारवाई झालेली नाही. (Terror of Koyata Gang among traders in Nashik Road area)