यूपीतील कथित धर्मांतर प्रकरण, नाशिकमध्ये अटक झालेल्या आतिफच्या कुटुंबीयांचीही कसून चौकशी

चंदन पुजाधिकारी

| Edited By: |

Updated on: Sep 28, 2021 | 7:19 AM

आतिफ हा कुणाल अशोक चौधरी या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून सोमवारी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने त्याची धरपकड केली होती.

यूपीतील कथित धर्मांतर प्रकरण, नाशिकमध्ये अटक झालेल्या आतिफच्या कुटुंबीयांचीही कसून चौकशी
कथित धर्मांतर प्रकरणात नाशिकमधून कुणाल उर्फ आतिफला अटक.

Follow us on

नाशिक : उत्तर प्रदेशमधील कथित धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या कुणाल उर्फ आतिफच्या कुटुंबीयांची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे. संशयित आतिफच्या वडिलांची काल (सोमवारी) 3 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज घरातील इतर सदस्यांना पोलीस पाचारण करण्याची चिन्हं आहेत. एटीएसच्या कारवाईनंतर नाशिक पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकही सतर्क झाले आहे. आतिफच्या स्थानिक नेटवर्कचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु असून आणखी काही प्रमुख धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

आतिफ हा कुणाल अशोक चौधरी या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून सोमवारी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने त्याची धरपकड केली होती. परदेशातील वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये आतिफच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले आहे. मात्र पैसे कुठून आले, याचा तपशील उपलब्ध नाही. दहशतवाद विरोधी पथक या बाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या कथित धर्मांतर प्रकरणात आतिफचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे. उत्तर प्रदेशमधील या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे.

काय आहे कथित धर्मांतर प्रकरण?

उत्तर प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार नागरिकांचं धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप होत असून, धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती. या प्रकरणी नाशिकच्या कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफसह मुजफ्फनगर (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीलला दहशतवाद विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

कुवैतसह इतर देशांतून निधी गोळा

आतिफच्या खात्यात चक्क 20 कोटी रुपये जमा केले गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कथित धर्मांतर करण्यासाठी हा निधी गोळा केल्याचा आरोप होत आहे. कुवैतसह जगभरातल्या इतर देशांमधून कुणालच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली होती. आता हा निधी कोणाकोणाच्या खात्यातून पाठवण्यात आला आहे. त्यांची यादी तयार करून या व्यक्ती कोण आहेत, याची झाडाझडतीही घेण्यात येणार आहे. सोबतच हा निधी फक्त धर्मांतरणासाठी वापरायचा होती की, इतर काही कारवायांसाठी. याचा तपासही दहशतवाद विरोधी पथकाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रस्टच्या माध्यमातून फंडिंग

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यातले अनेक जण वेगवेगळ्या विश्वस्थ संस्था म्हणजेच ट्रस्ट चालवायचे. या ट्रस्टसाठी जगभरातून फंडिंग सुरू होती. या निधीचा कथित धर्मांतरणासाठी वापर केला जात होता. यातला एक जण जसा नाशिकमध्ये नाव बदलून राहिला होता, तसेच इतरही अनेक जण आपली ओळख लपवून रहात असल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या :

यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

उत्तर प्रदेशच्या धर्मांतरण रॅकेटचं बीड कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI