5

उत्तर प्रदेशच्या धर्मांतरण रॅकेटचं बीड कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्याच्या शिरसाळा गावातील इरफान शेख नावाच्या तरुणाला अटक झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या धर्मांतरण रॅकेटचं बीड कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 8:14 PM

बीड : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्याच्या शिरसाळा गावातील इरफान शेख नावाच्या तरुणाला अटक झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. धर्मांतरासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मराठवाड्यातला तरुण सापडल्यामुळे सध्या मराठवाड्यात पुन्हा एकदा दहशतवादी चळवळ पाय पसरते आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे (Know all about Beed connection with UP religious conversion).

बीडच्या तरुणावर धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

इरफान शेख हा तरुण जो मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळी सारख्या दुर्गम तालुक्यातल्या शिरसाळा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. या तरुणाचं शिक्षण सुद्धा शिरसाळा गावातल्या प्राथमिक शाळेत झालं. यानंतर नोकरीच्या निमित्ताने हा तरुण दिल्लीत गेला. त्या ठिकाणी सध्या तो प्रोफेसर म्हणून काम करतोय. मात्र, प्रोफेसर म्हणून काम करत असणारा हा तरुण धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी केलाय. तसेच या प्रकरणात त्याला पोलिसांकडून अटकही झाली. यामुळे सध्या या तरुणाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होतोय. लोकांचं धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा आहे.

इरफानच्या कुटुंबाने आरोप फेटाळले

इरफानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेले आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळून लावले आहेत. इरफान असं असं करू शकत नाही असं त्याच्या कुटुंबाचा म्हणणं आहे.

कुटुंबीयांचा काहीही दावा असला तरी उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासामध्ये काय समोर येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस आरोपपत्रात इरफानवर कुठले कुठले आरोप दाखल करतात आणि त्यासाठी कुठले कुठले पुरावे देतात हेही या प्रकरणात महत्त्वाचं आहे. यातूनच इरफानचा या रॅकेटमधील सहभाग स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक

व्हिडीओ पाहा :

Know all about Beed connection with UP religious conversion

Non Stop LIVE Update
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?