Nashik Murder : धक्कादायक ! आधी मेव्हणीशी अनैतिक संबंध बनवले, मग लग्नाचा तगादा लावला म्हणून विळ्याने वार करत संपवले

लक्ष्मीने खरोखरच शरदच्या झोपडीला आग लावली. या आगीत शरदच्या बाजूच्या दोन झोपड्याही जळाल्या. यामुळे शरदलाही राग अनावर झाला अन् त्याने विळा घेऊन लक्ष्मीवर वार केला. यात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्यानेच लक्ष्मीला मारल्याचे सांगत शरदने पोलिसांकडे बनाव केला.

Nashik Murder : धक्कादायक ! आधी मेव्हणीशी अनैतिक संबंध बनवले, मग लग्नाचा तगादा लावला म्हणून विळ्याने वार करत संपवले
आधी मेव्हणीशी अवैध संबंध बनवले, मग लग्नाचा तगादा लावला म्हणून विळ्याने वार करत संपवले Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 4:04 PM

नाशिक : मेहुणी वारंवार लग्नाचा तगादा लावत होती म्हणून तिच्यावर विळ्याने वार करुन तिची हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नाशिकमधील इगतपुरी येथे घडली आहे. लक्ष्मी संजय पवार (24) असे मयत महिलेचे नाव आहे. शरद महादू वाघ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून आरोपी शरदला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. शरदचे आधीच लग्न झाले असून त्याला दोन बायका आहेत. तर लक्ष्मीचेही दोन विवाह झाले होते. त्यानंतर तिचे शरदसोबत अनैतिक संबंध (Illegal Relation) जुळले. लक्ष्मी सतत शरदकडे लग्नाचा तगादा लावत होती. मात्र शरदला तिसऱ्या पत्नीचा खर्च परवडणारा नसल्याने त्याने तिला नकार दिला. याच वादातून ही घटना घडली.

वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने हत्या

आरोपी शरदचे लक्ष्मी हिच्या मोठ्या दोन बहिणी मीना आणि सावित्री यांच्यासोबत विवाह झाला आहे. हे तिघेही इगतपुरी येथील ताराची वाडी एका झोपडीत राहत होते. शरद हा ऊसतोड मजुर आहे. लक्ष्मी ही नांदगाव तालुक्यातील बिरुले गावची असून काही दिवसांपूर्वी तिला ऊसतोड मजुरीचे काम मिळाल्याने ती शरद आणि आपल्या मोठ्या बहिणींसोबत ताराची वाडी येथे रहायला आली होती. याचदरम्यान लक्ष्मीचे शरदसोबत अनैतिक संबंध जुळले. यानंतर लक्ष्मी शरदकडे वारंवार लग्न करण्याचा हट्ट करु लागली. मात्र आधीच बेताची परिस्थिती आणि दोन बायकांची जबाबदारी असलेल्या शरदला तिसऱ्या पत्नीचा खर्च परवडणारा नव्हता. यामुळे त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे संतापलेल्या लक्ष्मीने त्याला त्याचे घर जाळण्याची धमकी दिली.

आधी महिलेने झोपडी पेटवली मग आरोपीने तिलाच संपवले

लक्ष्मी खरोखरच घर जाळेल असे वाटले नाही, त्यामुळे शरदने लक्ष्मीची धमकी मनावर घेतली नाही. मात्र लक्ष्मीने खरोखरच शरदच्या झोपडीला आग लावली. या आगीत शरदच्या बाजूच्या दोन झोपड्याही जळाल्या. यामुळे शरदलाही राग अनावर झाला अन् त्याने विळा घेऊन लक्ष्मीवर वार केला. यात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्यानेच लक्ष्मीला मारल्याचे सांगत शरदने पोलिसांकडे बनाव केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शरदची कसून चौकशी केली असता त्यानेच लक्ष्मीची हत्या केल्याचे कबुल केले. (Woman killed for demanding marriage at Igatpuri in Nashik)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.