लग्न खरेदीच्या नावाखाली बनावट Paytm अ‍ॅपद्वारे गंडा, नवी मुंबईत बंटी-बबलीच्या टोळीला अटक

लग्न खरेदीच्या नावाखाली बनावट Paytm अ‍ॅपद्वारे गंडा, नवी मुंबईत बंटी-बबलीच्या टोळीला अटक
नवी मुंबईत बंटी बबली गँगला बेड्या

बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे खरेदीचे बिल पे केल्याचा खोटा मेसेज विक्रेत्यांना दाखवून ते फसवणूक करत असत. (Navi Mumbai Bunty Bubbly Gang )

अनिश बेंद्रे

|

Mar 28, 2021 | 11:54 AM

नवी मुंबई : लग्न खरेदीच्या नावाखाली बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे दुकानदारांना हजारोंचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील या अट्टल चोरट्यांकडून जवळपास 75 हजारांचे कपडे ताब्यात घेण्यात आले आहेत. (Navi Mumbai Crime News Bunty Bubbly Gang busted who looted traders by fake Paytm App)

लग्नासाठी खरेदी करायची आहे, असं सांगून नवी मुंबईतील विविध दुकानं आणि मॉलमधून महागड्या वस्तू, कपडे यांची खरेदी करुन स्वतःला आणि आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू देणाऱ्या नवी मुंबईच्या बंटी-बबलीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे खरेदीचे बिल पे केल्याचा खोटा मेसेज विक्रेत्यांना दाखवून ते फसवणूक करत असत.

वाशी येथील अदा बूटीक या दुकानातून जवळपास 38 हजार रुपयांची कपडे खरेदी करुन या दोघांनी पेटीएमद्वारे बिल पे केले. दुकानदाराला पैसे भरल्याचा खोटा मेसेज दाखवून दोघांनी पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर दुकानदाराने वाशी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी बंटी-बबलीला पकडण्यासाठी पथक तयार केले. पथकाने घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपींचा शोध लावला.

31 वर्षीय मुख्य आरोपी प्रेम नवरोत्तम सोलंकी आणि त्याची 23 वर्षीय मैत्रीण प्रिती राजेश यादव दुकानात प्रवेश करुन खरेदीसाठी पती-पत्नी असल्याचं भासवत. खोटे नाव सांगून त्यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच फसवणूक करताना ते पेटीएम स्पूफ नावाच्या अॅप्लिकेशनद्वारे बनावट बिल पे केल्याची पावती तयार करुन दुकानदारांची फसवणूक करत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणूक केलेले जवळपास 75 हजार रुपयांचे वेगवेगळया रंगाचे कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना वाशी न्यायायला हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपींनी अशाच प्रकारचे विविध गुन्हे नवी मुंबई परिसरात केल्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने विविध मॉल, व्यापारी, ज्वेलर्स, दुकानदार यांना संपर्क करुन त्या दृष्टीने माहिती काढण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शना खाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल ( गुन्हे ), गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांने हा तपास केला.

संबंधित बातम्या :

गुजरातहून स्पोर्ट्स बाईकने येऊन मुंबईतील व्यापाऱ्यांची लूट, दिंडोशीत दोघांना बेड्या

(Navi Mumbai Crime News Bunty Bubbly Gang busted who looted traders by fake Paytm App)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें