बंद BS-4 गाड्यांची बॅक डेट नोंदणी, शेकडो गाड्या विकल्या, आंतरराज्यीय टोळीतील 9 जणांना नवी मुंबईत अटक

| Updated on: Mar 03, 2021 | 3:18 PM

बंद असलेल्या BS-4 गाड्यांची बॅक डेट नोंदणी करुन शेकडो (Navi Mumbai Police Arrest Gang) गाड्या विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बंद BS-4 गाड्यांची बॅक डेट नोंदणी, शेकडो गाड्या विकल्या, आंतरराज्यीय टोळीतील 9 जणांना नवी मुंबईत अटक
BS4 Vehicle
Follow us on

नवी मुंबई : बंद असलेल्या BS-4 गाड्यांची बॅक डेट नोंदणी करुन शेकडो (Navi Mumbai Police Arrest Gang) गाड्या विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 151 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्क्रॅपमध्ये गाडी घेऊन खोटे कागदपत्रे आणि बोगस इनवॉईस तयार करुन, बोगस चेसीज नंबर टाकून ग्राहकांना विकले आहेत (Navi Mumbai Police Arrest Gang Of 9 Who Sold Closed BS4 Vehicle After The Back Date Registration).

बंद BS-4 गाड्यांची बॅक डेट नोंदणी

नवी मुंबई BS4 गाड्या बॅक डेट नोंदणी करुन विकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. नवीन तसेच जुन्या गाड्यांचे चेसीज नंबर टाकून स्क्रॅप करण्यात आलेल्या बीएस फोर गाड्या नागरिकांना विकण्यात आल्या होत्या. एकूण 120 गाड्या विकण्यात आल्याचे समोर आले आहे. हरियाणा, राजस्थान, गुजरात, हैद्राबाद, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल अशा विविध ठिकाणाहून हा गोरख धंदा चालत होता. या प्रकरणात नऊ जणांना अटक केली असून डुप्लिकेट चेसीज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

देशात पहिल्यांदाच अशा प्रकारात  बीएस फोर गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. नवीन तसेच जुन्या गाड्यांचे चेसीज नंबर टाकून स्क्रॅप करण्यात आलेल्या बीएस फोर गाड्या नागरिकांना विकण्यात आल्या होत्या. खोटे पेपर तयार करून वाहतूक विभागाकडून या गाड्यांची  नोंदणी करून घेतली जात होती.

पनवेल येथील शिरढोण येथून या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, हरियाना, राजस्थान, गुजरात, हैद्राबाद, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणाहून हा गोरखधंदा चालत होता. या प्रकरणात 7 कोटी 15 लाख किमतीच्या कार जप्त केल्या आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सह पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, मध्यवर्ती कक्षाचे एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

ही टोळी कशी काम करायची?

पनवेल शिरढोण येथील श्री बालाजी हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंग येथे खोली भाड्याने घेऊन आरोपींची कार्यालय थाटले होते. कंपनीने स्क्रॅप करण्यासाठी दिलेल्या जवळपास चारशे गाड्या पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे सांगत या गाड्यांची विक्री केली जात होती. या गाड्यांसाठी खोटे चेसीज नंबर आणि संबंधित इतर खोटी कागदपत्रे तयार करून विविध राज्यातून वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावे नोंदणी करण्यात येत होती.

BS4 गाड्यांवर बंदी

केंद्र शासनाने वाढत्या प्रदूषणामुळे बीएस फोर प्रकारच्या गाड्यांवर मार्च 2020 मध्ये बंदी आणल्याने अटोमोटिव्ह कंपनीने मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या भंगारात विकल्या होत्या. तर संबंधित कंपनीने या गाड्या स्क्रॅप करण्याएवजी खोटे चेसीज नंबर टाकून करोडो रुपयांच्या गाड्या विकल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात अधिक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गाडी मालक हवालदिल झाले असून हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून या प्रकारात कोट्यवधी रुपयांचा अपहार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर गाडी मालकांना त्यांचे पैसे मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Navi Mumbai Police Arrest Gang Of 9 Who Sold Closed BS4 Vehicle After The Back Date Registration

संबंधित बातम्या :

रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!

दारु विक्रेत्यांचा मोठा प्लान नागपूर पोलिसांकडून उद्ध्वस्त; ‘या’ कारणासाठी केला होता दारुसाठा

इंदापुरातून चोरीला गेलेले 29 फ्रीज परभणीत सापडले