रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!

रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांची 18 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. (Vasai Rickshaw Driver Murder )

  • मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 11:28 AM, 3 Mar 2021
रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!
रिक्षाचालक पुंडलिक पाटील हत्या

पालघर : वसईतील रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. (Vasai Crime Rickshaw Driver Murder Police Constable Wife Boyfriend duo arrested)

रिक्षाचालक पुंडलिक पाटील हत्या प्रकरणी अटकेत असलेली पुंडलिकची पत्नी आणि तिचा प्रियकर हे दोघेही पोलीस कर्मचारी आहेत. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विकास पष्टे आणि आरोपी महिला कॉन्स्टेबल हे दोघंही वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

पत्नी-प्रियकरासह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

विकास पष्टे आणि पुंडलिक पाटील याची पत्नी या दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जातो. प्रेमात अडसर ठरणाऱ्या रिक्षाचालक पतीचा दोघांनी काटा काढला. पत्नी आणि प्रियकर विकास पष्टे यांच्यासह एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

रिक्षातच रिक्षाचालकाचा मृतदेह

रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांची 18 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ढेकाळे परिसरात रिक्षामध्येच पुंडलिक पाटील यांचा मृतदेह आढळला होता. रिक्षातच चालकाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मनोर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीची हत्या

डोंबिवलीतील रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीच्या हत्याकांडांच गूढ अवघ्या काही तासात उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. कामगाराने दुकानदाराच्या पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची केलेली मागणी होती. मात्र महिलेने त्याची निर्लज्ज मागणी धुडकावत पतीकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या कामगाराने दुकानदाराच्या पत्नी दुकानातच हत्या केली. डोंबिवलीत लोढा हेवन परिसरात घडलेल्या घटनेमुळे रविवारी एकच खळबळ उडाली होती. (Vasai Crime Rickshaw Driver Murder Police Constable Wife Boyfriend duo arrested)

महिलेकडून तक्रारीची धमकी

मालकाच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत गुड्डूने दुकानदाराच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिने त्याची मागणी धुडकावताच गुड्डूने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गुड्डूचं असभ्य वर्तन पाहून महिलेचा पारा चढला. तिने आपल्या पतीकडे याविषयी तक्रार करण्याची धमकी दिली.

महिलेची चाकू भोसकून हत्या

महिलेची धिटाई पाहून आरोपी गुड्डू घाबरला. त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. दुकान मालक घरी परतला, तेव्हा त्याची पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संबंधित बातम्या :

लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं

पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

(Vasai Crime Rickshaw Driver Murder Police Constable Wife Boyfriend duo arrested)