लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं

मालकाच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत गुड्डूने दुकानदाराच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली (Dombivali Shop owner wife murder)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:16 AM, 3 Mar 2021
लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं
Husband Commits Suicide In usmanabad

डोंबिवली : डोंबिवलीतील रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीच्या हत्याकांडांच गूढ अवघ्या काही तासात उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. कामगाराने दुकानदाराच्या पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची केलेली मागणी होती. मात्र महिलेने त्याची निर्लज्ज मागणी धुडकावत पतीकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या कामगाराने दुकानदाराच्या पत्नी दुकानातच हत्या केली. डोंबिवलीत लोढा हेवन परिसरात घडलेल्या घटनेमुळे रविवारी एकच खळबळ उडाली होती. (Dombivali Crime Ration Shop owner wife murder mystery solved)

मानपाडा पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी गुड्डू कुमार उर्फ ​​रंजनला अटक केली आहे. आरोपी गुड्डू कुमार डोंबिवलीतील किराणा दुकानात काम करत होता. रविवारी संध्याकाळी दुकानाच्या मालकाने त्याला जेवणासाठी घरी बोलावलं.

दुकानदाराच्या अनुपस्थितीचा गैरफायदा

दुकान मालक राजेश गुप्ता आणि त्याची पत्नी श्वेता गुप्ता यांनी जेवणाआधी ड्रिंक्स घेतली. तिघं जण गप्पा मारत बसले असताना दुकानदाराला महत्त्वाचा कॉल आला. कामानिमित्त त्याला घराबाहेर जावं लागलं. त्यावेळी घराच्या मागच्या बाजूला दुकानदाराची पत्नी आणि कामगार गुड्डू एकटेच होते.

महिलेकडून तक्रारीची धमकी

मालकाच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत गुड्डूने दुकानदाराच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. तिने त्याची मागणी धुडकावताच गुड्डूने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गुड्डूचं असभ्य वर्तन पाहून महिलेचा पारा चढला. तिने आपल्या पतीकडे याविषयी तक्रार करण्याची धमकी दिली.

महिलेची चाकू भोसकून हत्या

महिलेची धिटाई पाहून आरोपी गुड्डू घाबरला. त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. दुकान मालक घरी परतला, तेव्हा त्याची पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुकान मालकाने मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुकानदाराचा जबाब नोंदवला. त्याने कामगारावर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी एका झोपडपट्टीवर धाड टाकून गुड्डू कुमारला ताब्यात घेतलं. पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत गुड्डूने गुन्ह्याची कबुली दिली.

संबंधित बातम्या :

रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या, डोंबिवलीत खळबळ

कल्याण-डोंबिवलीत एका आठवड्यात तीन महिलांची हत्या, शहर हादरलं

(Dombivali Crime Ration Shop owner wife murder mystery solved)