रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या, डोंबिवलीत खळबळ

दुकानातील कामगारानेच श्वेता गुप्ता यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे (Dombivali Ration Shop murder)

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 11:11 AM, 1 Mar 2021
रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या, डोंबिवलीत खळबळ
डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीची हत्या

डोंबिवली : डोंबिवलीत रेशनिंग दुकानातच महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानातील कामगारानेच महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. मयत महिला ही दुकानदाराची पत्नी होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Dombivali Ration Shop owner wife murder)

लोढा हेवन परिसरात हत्याकांड

डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या करण्यात आली. श्वेता राजेश गुप्ता असं मयत महिलेचं नाव आहे.

दुकानातील कामगार ताब्यात

दुकानातील कामगारानेच श्वेता गुप्ता यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयित आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुड्डू कुमार सिंग असं संशयित कामगाराचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जालन्याच्या विद्यार्थ्याची पुण्यात हत्या

पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित या तरुणाची हत्या करण्यात आली. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात सुदर्शन पंडित राहत होता. तो मूळ जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळचा (पंडित) रहिवासी होता. (Dombivali Ration Shop owner wife murder)

धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन सुदर्शनची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला.

सुदर्शनच्या हत्येबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

गतिमंद मुलीने दुसऱ्या गतिमंद मुलीला दुस-या मजल्यावरुन फेकलं, कोथरुडमधील धक्कादायक प्रकाराचा CCTV

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

(Dombivali Ration Shop owner wife murder)