दारु विक्रेत्यांचा मोठा प्लान नागपूर पोलिसांकडून उद्ध्वस्त; ‘या’ कारणासाठी केला होता दारुसाठा

नागपुरात तब्बल सव्वा दोन लाखांची अवैध विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे (Nagpur Illegal Foreign Liquor Stock Seized).

  • सुनिल ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 15:01 PM, 2 Mar 2021
दारु विक्रेत्यांचा मोठा प्लान नागपूर पोलिसांकडून उद्ध्वस्त; 'या' कारणासाठी केला होता दारुसाठा
Nagpur Liquor Seized

नागपूर : नागपुरात तब्बल सव्वा दोन लाखांची अवैध विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे (Nagpur Illegal Foreign Liquor Stock Seized). नागपुरात वाढत असलेल्या कोरोनामुळे लॉकडाऊन होईल आणि आपल्याला अवैध दारु विक्री करुन मोठा पैसा कामविता येईल, या उद्देशाने या लोकांनी अवैध दारुचा मोठा साठा साठवून ठेवला होता. या तिघांना नागपूर पोलिसांनी अटक घेतली आहे (Nagpur Illegal Foreign Liquor Stock Seized).

या तिघांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा तळघरात साठवून ठेवला होता. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी या तिघांना अटक करुन मोठ्या प्रमाणात दारु जप्त केली आहे.

गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला हा इतक्या मोठ्या प्रमाणात दारु साठा बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना त्यांच्या माहितीदाराने गुप्त माहिती दिली होती. या माहितीनुसार, इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंदन नगर येथे संजय कोहली नावाच्या व्यक्तीने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा अवैध साठा जमा करुन ठेवला आहे.

यावरुन पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली. तेव्हा त्याच्या घराच्या तळघरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रँडच्या विदेशी दारुचा साठा आढळून आला. यामध्ये 16 पेटी विस्की, 35 पेटी देशी दारु, 15 पेटी बिअर अशा तब्बल 66 पेटी दारु जप्त करण्यात आली. या दारुची एकूण किंमत 2 लाख 25 हजारच्या जवळपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा अवैध पद्धतीने विक्री करण्यासाठी लपवून ठेवला असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे एक्साईज खात्याची याकडे नजर नव्हती का, असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत.

Nagpur Illegal Foreign Liquor Stock Seized

संबंधित बातम्या :

जादूटोणा करुन तुझ्यावर पैशांचा पाऊस पाडेन, अल्पवयीन मुलीच्या फसवणुकीचा प्रयत्न, पाच जण गजाआड

सिगारेट तस्करी रॅकेट उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरपीएफ जवानांची कारवाई

इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद