सिगारेट तस्करी रॅकेट उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरपीएफ जवानांची कारवाई

नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी सिगारेट तस्करीचं रॅकेटची भांडाफोड केली आहे. Nagpur RPF cigarette racket

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 19:28 PM, 1 Mar 2021
सिगारेट तस्करी रॅकेट उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरपीएफ जवानांची कारवाई
नागपूर आरपीएफ

नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी सिगारेट तस्करीचं रॅकेटची भांडाफोड केली आहे. खोट्या मालाचं विवरण देऊन सिगारेटची वाहतूक केली जात होती. आरपीएफच्या जवानांनी सिगारेटची 19 हजार 200 पाकीट जप्त केली आहेत. जवानांनी पकडलेल्या सिगारेटची बाजारातील किंमत 9 लाख 60 हजार रुपये इतकी होते. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Nagpur RPF constable exposed cigarette racket)

सिगारेट सारखा वास आसल्यानं चौकशी

नागपुरात रात्रीची गस्त घालत असलेल्या आरपीएफ जवानांना एका व्यक्ती जवळ असणाऱ्या पार्सलचा वास येत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो दचकला. आरपीएफ जवानांनी त्याची विचारपूस केली मात्र तो उडवाउडवीची उत्तर देत होता.. यावरून जवानांनी त्याची चौकशी केली असता त्यात सिगारेट मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. संबंधित व्यक्ती जवळ असलेले पार्सल बुकिंगचे पेपर तपासले असता वेगळ्याच मालाचं विवरण त्यामध्ये होते. मात्र, पार्सलमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट आढळून आल्या त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक दिलीप सिंग यांनी दिली.

तस्करीचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न

आरपीएफ जवानांकडून आता सिगारेट तस्करीच्या खोलात जाण्याता प्रयत्न करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिगारेट कोण पाठवतं होते आणि ती कोणाकडे जाणार होती. सिगारेटची तस्करी का केली जात आहे. याच गूढ सुद्धा उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

जादूटोणा शिकवण्याची बतावणी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक

जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी बतावणी करून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह पाच जणांना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचला आणि डीआर ऊर्फ सोपान हरिभाऊ कुमरे हा मांत्रिक असून त्याचे सहकारी विक्की खापरे, विनोद मसराम , दिनेश निखारे आणि रामकृष्ण म्हसकर, याना अटक केली. डीआर ऊर्फ सोपान कुमरे या टोळीचा सूत्रधार आहे.


संबंधित बातम्या:

मुंबई पोलिसांची कमाल, 77 वर्षीय महिलेच्या हत्याप्रकरणी चार दिवसांमध्ये आरोपींना बेड्या

पोलीस निरीक्षकाच्या दालनातच चाकू हल्ला; कराड शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

(Nagpur RPF constable exposed cigarette racket at Nagpur Railway Station)