AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Crime : हायटेक परीक्षा, हायटेक कॉपी… करायची होती एमपीएससी क्रॅक, स्पाय कॅमेऱ्यामुळे गेला…

परीक्षेत पास होण्यासाछी विद्यार्थ्याने तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Navi Mumbai Crime : हायटेक परीक्षा, हायटेक कॉपी... करायची होती एमपीएससी क्रॅक, स्पाय कॅमेऱ्यामुळे गेला...
| Updated on: Sep 22, 2023 | 2:47 PM
Share

नवी मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : आजकाल बहुतांश जण कामासाठी टेक्नॉलॉजीचा (technology) वापर करताना दिसतात. तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की त्यामुळे कामही सोपं झालं आहे. पण कोणी याचा टेक्नॉलॉजीचा गैरवापर करत असेल तर ? अशीच एक घटना नवी मुंबईमध्ये उघडकीस आली आहे. तेथे एका विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी (copy in exam) करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत कॉपी केल्याचे समोर आले आहे. एमपीएससीच्या परीक्षेत हा गैरप्रकार घडल्याचे समजते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या बेलापूर कार्यालयाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराविरुद्ध परीक्षा केंद्रावर स्पाय कॅमेरा वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या नॉनगॅझेटेड ग्रुप बी (B) आणि ग्रुप सी (C) सर्व्हिसेसची संयुक्त प्राथमिक परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये या विद्यार्थ्याने स्पाय कॅमेराचा वापर करून कॉपी केली होती. याप्रकरणी त्या विद्यार्थ्यासह आणखी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. एमपीएससीच्या वरिष्ठ अधिकारी सुप्रिया लकडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, बेलापूर पोलिसांनी या विद्यार्थ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जालन्याच्या विद्यार्थ्याने केली कॉपी

फिर्यादीतील माहितीनुसार, आकाश भाऊसिंग घुनावत (२७) असे विद्यार्थ्याचे नाव असून जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. ३० एप्रिल रोजी पुण्यातील जेएसपीएम जयवंतराव सावंत इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या परीक्षेला तो बसला होता. घुनावत याने परीक्षा हॉलच्या बाहेर प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला आणि त्याच्या मोबाइलवर उत्तरे मिळवली. कॉपी करत त्याने ही परीक्षा पास केल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलीस भरती २०२१ च्या लेखी परीक्षेतील गैरप्रकारांबाबत चेंबूरच्या पूर्व विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे पत्र आल्यावर एमपीएससी बेलापूर कार्यालयाला परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल माहिती मिळाली. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींपैकी शंकर चैनसिंग जारवाल (वय ३०) याला अटक केली होती. तोही जालनाचा रहिवासी आहे. आरोपीने अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना स्पाय कॅमेरा वापरून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यास मदत केली होती. त्यासाठी त्यांनी दूरच्या ठिकाणी असूनही टेक्नॉलॉजीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तरे मिळवून दिली. आकाश घुनावत यानेही एप्रिल 2023 मध्ये झालेल्या परीक्षेतही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पोलिसांना आढळले.

या परीक्षेला बसलेले विद्यार्थी स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून जीवन नैमाने या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवत असत. त्यानंतर तो पेपर सोडवून त्याची उत्तरे विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवत असे. अशा रितीने विद्यार्थी कॉपी करून परीक्षेत पास व्हायचे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.