AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात आलीय नवी ‘बबली’, आधी मैत्री करते, मग पैशांची डिमांड, नाही ऐकलं तर…

ती त्याला ब्लॅकमेलिंग करू लागली. त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिच्या मित्रांनी तरुणाला धमकी देण्यास सुरवात केली.

महाराष्ट्रात आलीय नवी 'बबली', आधी मैत्री करते, मग पैशांची डिमांड, नाही ऐकलं तर...
CRIME NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 17, 2023 | 11:18 PM
Share

बंगलुरू : महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यात एका बबलीने चांगलाच धुमाकूळ घातलाय. ही बबली इन्स्टाग्राम, फेसबुकवर आपली सावज शोधते. त्यांच्याशी मैत्री करते. एकदा मैत्री झाली की सावजाला भेटायला बोलावून त्याच्याशी शरीर संबध ठेवते. त्याचे व्हिडीओ काढून सावजाकडे पैशांची मागणी करते. त्याने पैसे दिले नाही तर मुस्लीम धर्म स्वीकारून लग्न करण्यास भाग पाडते. अशा पद्धतीने या बबलीने एकूण ५० जणांना ठकवले आहे. विशेष म्हणजे ही बबली महाराष्ट्रातीलच आहे.

हनी ट्रॅपचा बळी ठरलेल्या एका तरुणाने थेट बंगळूर पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. नेहा नावाच्या मुलीसोबत त्याची टेलिग्राम अॅपवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात संभाषण होऊ लागले. त्यांची मैत्री वाढली. एके दिवशी नेहाने त्या तरुणाला एका घरी भेटायला बोलावले. तेथे त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले.

त्याचा व्हिडिओ तयार केला

नेहा आणि तो तरुण त्या खोलीत कामक्रीडा करत होते. पण, नेहाचे मित्र आधीपासूनच त्या खोलीत लपून बसले होते. त्यांनी त्याचे फोटो काढले, त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर काही दिवसांनी नेहा हिने त्या तरुणाकडे पैशांची मागणी केली. ती त्याला ब्लॅकमेलिंग करू लागली. त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिच्या मित्रांनी तरुणाला धमकी देण्यास सुरवात केली. पैसे दे नाही तर नेहाशी लग्न करून मुस्लीम धर्म स्वीकार अशी धमकी ते मित्र तरुणाला देऊ लागले.

पोलिसात तक्रार दाखल

पिडीत तरुणाने बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हनी ट्रॅपद्वारे पैसे उकळल्याप्रकरणी कलम ३४८ आणि ४२० अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास करत असताना पोलिसांना अधिक धक्कादायक माहिती मिळाली.

पोलिसांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन जणांना अटक केली. तर, मुख्य आरोपी नेहा उर्फ ​​मेहर नावाची तरुणी फरार आहे. नेहा ही महाराष्ट्रातील रहिवासी असून तिचे अन्य तीन साथीदार हे कर्नाटकातील आहेत. नेहा आणि तिच्या मित्रांनी आतापर्यंत 50 जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या तरुणांनी 35 लाखांहून अधिक रक्कम लुबाडल्याची कबुली दिली. तर तक्रार दाखल केल्या तरुणाकडून त्यांनी ५० हजार रुपये उकळल्याची माहिती दिली. गेल्या दीड वर्षांपासून हे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून 60 हजार रुपये जप्त करण्यात केले आहेत. तर, फरार आरोपी महिला नेहा उर्फ ​​मेहर हीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, त्यांनी जबरदस्तीने कुणाचे धर्मांतर केले आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.