Kolhapur NIA raid : एनआयएची कोल्हापुरात कारवाई, पहाटेच छापा टाकत दोघा भावांना अटक; कारण अद्याप अस्पष्ट

ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यातील एक तरूण या फाऊंडेशनच्या माध्यमातून येथे कार्यरत आहे. त्यांने एका जिल्ह्यातील केंद्रात शिक्षण घेतले आहे. मजुरीवर चांदी काम करण्याचा त्याच्या वडिलांचा व्यवसाय आहे.

Kolhapur NIA raid : एनआयएची कोल्हापुरात कारवाई, पहाटेच छापा टाकत दोघा भावांना अटक; कारण अद्याप अस्पष्ट
एनआयए
प्रदीप गरड

|

Jul 31, 2022 | 2:51 PM

कोल्हापूर : दहशतवादी संघटना आयसीस (ISIS) प्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांत ही छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर याठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. कोल्हापुरातील हुपरी रेंदाळ याठिकाणी हा छापा टाकण्यात आला आहे. एनआयएने पहाटेपासून छापेमारी सुरू (NIA raid) केली आहे. येथील इर्शाद शेख, शौकत शेख यांना ताब्यात घेतले आहे. पहाटे चारदरम्यान एनआयएचे पथक याठिकाणी दाखल झाले. इर्षादला कशासाठी ताब्यात घेतले याबद्दल कुटुंबीयांना माहिती नाही. सकाळी दहावाजेपर्यंत हे कर्मचारी याठिकाणी होते, असे इर्षादच्या कुटुंबीयांनी सांगितले. एनआयएच्या पथकाने पहाटे चार ते सव्वा चारच्या सुमारास हुपरी-रेंदाळ येथील अंबाबाई नगरमधील एका घरात छापा टाकला. यावेळी इर्शाद शौकत शेख आणि त्याचा भाऊ अल्ताब शेख अशी अटक (Arrested) केलेल्या व्यक्तीची नावे आहेत. ताब्यात घेऊन सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे.

छाप्याची कोणालाही कुणकुण नाही

तब्बल सात तास एनआयएच्या पथकाने येथे चौकशी केली. दुमजली असलेल्या घरातील छाप्यात काही आक्षेपार्ह आढळते का, याची माहिती घेतली जात आहे. संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांकडून काही माहिती घेतली जात आहे. इर्शाद हा लबैक इमदाद फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहे. येथील चौकशी पूर्ण केल्यानंतर पथक दोघांनाही सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर घेऊन गेले आहेत. या छाप्याची कोणालाही कुणकुण न लागता कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

फाऊंडेशनच्या माध्यमातून सक्रीय

ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यातील एक तरूण या फाऊंडेशनच्या माध्यमातून येथे कार्यरत आहे. त्यांने एका जिल्ह्यातील केंद्रात शिक्षण घेतले आहे. मजुरीवर चांदी काम करण्याचा त्याच्या वडिलांचा व्यवसाय आहे. तर गेल्या काही काळापासून सामाजिक क्षेत्रात त्याचा सहभाग वाढला होता. आता आद पहाटे सव्वा चारच्या दरम्यान अचानक चार व्हॅनमधून आलेल्या पथकाने संबंधित तरुणाच्या घराची झडती घेतली. ही कारवाई संपूर्णतः गोपनीय ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें