NIA Raid : इसिस प्रकरणी एनआयएची सहा राज्यांमध्ये छापेमारी, देवबंदमधून मदरशातील विद्यार्थ्याला अटक

| Updated on: Jul 31, 2022 | 11:21 PM

एनआयएने भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहरे, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड आणि यूपीमधील देवबंद जिल्ह्यात छापे टाकले आहेत.

NIA Raid : इसिस प्रकरणी एनआयएची सहा राज्यांमध्ये छापेमारी, देवबंदमधून मदरशातील विद्यार्थ्याला अटक
इसिस प्रकरणी एनआयएची सहा राज्यांमध्ये छापेमारी
Follow us on

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलबाबत एनआयए (NIA)ने 6 राज्यांमध्ये छापे (Raid) टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये एनआयने छापेमारी करत संशयितांना ताब्यात (Detained) घेतले आहे. सहा राज्यांमधील 13 ठिकाणी एनआयएने छापा टाकला. या छापेमारीत एनआयएला काही संशयित वस्तू सापडल्या आहेत. एनआयएकडून या छापेमारीबाबत अद्याप काही सांगण्यात आली नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नांदेड या दोन्ही ठिकाणी एनआयएने छापेमारी करत 5 तरुणांना ताब्यात घेतले. मात्र त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले.

गुजरातमधील 4 जिल्ह्यांमध्ये छापा

NIA ने 25 जून रोजी आयपीसीच्या कलम 153A आणि 153B आणि UA(P) कायद्याच्या कलम 18, 18B, 38, 39 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात, एनआयएने भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहरे, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड आणि यूपीमधील देवबंद जिल्ह्यात छापे टाकले आहेत.

यूपीमधून एका संशयिताला अटक

एनआयए आणि एटीएसच्या पथकाने सहारनपूर, यूपीमधील देवबंद येथून मदरशात शिकणाऱ्या एका संशयित तरुणाला अटक केली आहे. फारुख असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. देवबंदमधील एका मदरशात बराच काळ शिकत होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान आहे. हा तरुण कर्नाटकातील आयएसच्या दहशतवादी मॉड्युलच्या संपर्कात होता आणि टेलीग्रामद्वारे दहशतवादी साहित्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करत असे. एनआयएने त्याला अटक करुन गोपनीय ठिकाणी नेले असून, त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

तीन दिवसांपूर्वी बिहारमधील 6 जिल्ह्यांमध्ये छापेमारी

पाटणा येथील फुलवारी शरीफ दहशतवादी प्रकरणासंदर्भात एनआयएच्या पथकाने गुरुवारी बिहारमधील 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. पाटणा, दरभंगा, मोतिहारी, नालंदा, अररिया आणि मधुबनीमध्ये एनआयएच्या पथकाने पोलिसांसह या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एनआयएच्या पथकाला विविध ठिकाणांहून डिजिटल उपकरणे आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. पाटण्यात पीएफआयचे संरक्षक अतहर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. एनआयएच्या पथकाने दरभंग्यात मिळून 3 ठिकाणी छापे टाकले. दरभंगाच्या उर्दू बाजारातील नुरुद्दीन जंगी आणि शंकरपूरमधील मोहम्मद मुस्तकीम आणि सनाउल्ला यांच्या घरी एनआयएचे पथक पोहोचले. तेथे त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांची चौकशी केली. (NIA raids in six states on ISIS, Madrassa student arrested from Deoband)