AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास

मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास
jail
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 7:34 AM
Share

नांदेड : एनआयए विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 2012 मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी नेते आणि पत्रकारांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी 2012 मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. (NIA Special Court Convicts Three Lashkar-e-Taiba Terrorists In 2012 Nanded Blast Case)

अटकेतील दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

कोर्टाने मंगळवारी मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. एनआयएनुसार अकरम रोजगाराच्या बहाण्याने सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्याच्या वेळी त्याची ओळख पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या विविध सदस्यांशी झाली.

काय होता कट?

सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरुसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडवण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एनआयएने कोर्टाला सांगितले.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

(NIA Special Court Convicts Three Lashkar-e-Taiba Terrorists In 2012 Nanded Blast Case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.