Nikki Murder Case Update: ‘मला कोणताही पश्चाताप नाही’, बायकोला जिवंत जाळणाऱ्या विपिनची पहिली प्रतिक्रिया
Nikki Murder Case Update: रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपी विपिनचा बायको निक्कीच्या निधनानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याची प्रतिक्रिया पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. त्याने ‘मला कोणताही पश्चाताप नाही’ असे आश्चर्यकारक विधान केले आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. निक्कीला मारणारा आरोपी तिचा पती विपिन भाटीची पोलिसांशी चकमक झाली, ज्यामध्ये त्याच्या पायात गोळी लागली. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे, पण त्याची उद्दाम वृत्ती अजूनही कमी झालेली नाही. मीडियाशी बोलताना विपिनने बायकोच्या निधनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पती-पत्नीमधील भांडण ही सामान्य बाब आहे असे तो म्हणाला. तसेच त्याला आपल्या या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही.
रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपी विपिनला मीडियाने जेव्हा विचारले की, तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप आहे का, तेव्हा त्याने सांगितले, “मला कोणताही पश्चाताप नाही, मी निक्कीला मारले नाही, ती स्वतः मेली आणि मला यावर काहीही बोलायचे नाही.” जेव्हा त्याला विचारले गेले की, तू तिला मारहाण करायचास, तेव्हा त्याने सांगितले की, पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असतात.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
आरोपी विपिनने हत्यार हिसकावून पळण्याचा केला प्रयत्न
ग्रेटर नोएडामध्ये कथितरित्या पत्नी निक्कीला जिवंत जाळण्याचा आरोपी पती विपिन भाटीचा पोलिसांनी एनकाउंटर केला आहे. विपिन भाटीला यापूर्वीच अटक झाली होती आणि रविवारी तो पोलिसांच्या ताब्यातून पळण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याची चकमक झाली. असा आरोप आहे की, विपिन भाटीने पोलिसांचे हत्यार हिसकावून ताब्यातून पळण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमात ग्रेटर नोएडाच्या सिरसा चौकाजवळ चकमक झाली, ज्यामध्ये विपिन भाटीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
निक्कीला तिच्या मुलासमोर आग लावली
निक्कीचे लग्न २०१६ मध्ये ग्रेटर नोएडाच्या कासना पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या विपिन भाटीशी झाले होते. काही दिवसांपूर्वी, निक्कीला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी कथितरित्या मारहाण केली आणि नंतर जाळून मारले. निक्कीच्या नातेवाइकांचा आरोप आहे की, तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळले. निक्कीला तिच्या मुलासमोर आग लावली गेली.
पोलिसांनी काय सांगितले?
अतिरिक्त डीसीपी सुधीर कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना फोर्टिस रुग्णालयाकडून एक मेमो मिळाला होता, ज्यामध्ये सांगण्यात आले होते की, एक मुलगी गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत दाखल झाली आहे आणि तिला सफदरजंग रुग्णालयात पाठवले जात आहे. या माहितीवर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, निक्कीचा आधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
