AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांसोबत पार्टीत आला… हायराईज सोसायटीच्या बाल्कनीत बॉडीच सापडली; एकच खळबळ

ग्रेटर नोएडामध्ये एका हायराईज सोसायटीच्या बाल्कनीत एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मित्रांसोबत पार्टीसाठी आलेल्या मनीष नावाच्या तरुणाचा मृतदेह सकाळी निदर्शनास आला. पोलिसांनी हत्या, आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू अशा विविध कोनांतून तपास सुरू केला आहे. मित्रांची चौकशी सुरू असून, पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

मित्रांसोबत पार्टीत आला... हायराईज सोसायटीच्या बाल्कनीत बॉडीच सापडली; एकच खळबळ
पार्टीसाठी आलेल्या तरूणाची सापडली डेडबॉडीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jan 16, 2026 | 9:43 AM
Share

ग्रेटर नोएडाच्या सूजरपूरमध्ये गुरुवारी रात्री मोठी सनसनाटी घटना घडली आहे. एका तरुणाची डेडबॉडी हायराईज सोसायटीच्या एका इमारतीच्या बाल्कनीत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीष असं या 20 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. तो सिकंदराबादच्या निजामपूर येथील रहिवासी आहे. काही मित्रांच्या सांगण्यावरून तो नोएडात आला होता. त्याच्या मित्रांनी पॅरामाऊंट सोसायटीच्या ओक टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी त्यांनी जोरदार पार्टी केली, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष आणि त्याचे मित्र पार्टी झाल्यावर रात्री रुममध्ये झोपले होते. सकाळी सोसायटीतील काही लोकांनी एका तरुणाला बाल्कनीत निपचित पडलेलं पाहिलं. आधी लोकांना समजलं नाही. पण जेव्हा जाऊन पाहिलं तेव्हा या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लोकांनी 112 क्रमांक फिरवून पोलिसांना सूचना दिली. काही वेळातच सूरजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंचनामा केला.

हत्या की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू

याबाबत सूरजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्राथिकदृष्ट्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही आत्महत्या आहे की धक्काबुक्कीत पडला की एखादी गुन्हेगारी घटना आहे, याचा आम्ही शोध घेत आहोत. पण त्यावर आतच काही सांगणं कठिण आहे. आम्ही याबाबतची चौकशी करत आहोत. पार्टीवेळी दारू व्यतिरिक्त अन्य काही नशा केला होता का? तसेच हा तरुण मानसिक तणावात होता का? याचाही आम्ही तपास करत आहोत, असं विनोद कुमार यांनी सांगितलं.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाल्कनी, फ्लॅट आणि आजूबाजूच्या परिसराची कसून पाहणी केली. मनीषजवळ सुसाईड नोटही सापडलेली नाहीये. पोलिसांनी या फ्लॅटमध्ये थांबलेल्या त्याच्या मित्रांचीही कसून चौकशी केली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा झगडा कानावर आला नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून फ्लॅट सील केला आहे. तसेच पोलिसांनी तपास हाती घेतला असून महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोस्टमार्टमनंतर खुलासा

पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात मनीषचा मृतदेह पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस सध्यातरी आत्महत्या आणि दुर्घटना या दोन्ही अँगलने तपास करत आहेत. मात्र, कोणत्याही प्रकारची शक्यता नाकारली जात नाहीये. मनीषच्या कुटुंबीयांनीही पोलिसांनी माहिती दिली आहे.

निकालाला अवघा अर्धा तास बाकी, त्या आधीच धंगेकर यांचं मोठं विधान
निकालाला अवघा अर्धा तास बाकी, त्या आधीच धंगेकर यांचं मोठं विधान.
खासगी गाडीत EVM आढळल्यानं गोंधळ ; नालासोपाऱ्यात खळबळ, नेमकं घडलं काय?
खासगी गाडीत EVM आढळल्यानं गोंधळ ; नालासोपाऱ्यात खळबळ, नेमकं घडलं काय?.
राडा, गोंधळ अन् काय-काय घडलं? कुठं मंत्र्याची पळापळ तर कुठं शाई....
राडा, गोंधळ अन् काय-काय घडलं? कुठं मंत्र्याची पळापळ तर कुठं शाई.....
महापौर साहेब... निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी, पुण्यात तुफान चर्चा
महापौर साहेब... निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी, पुण्यात तुफान चर्चा.
मुंबईचा फैसला आज होणार; ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार?
मुंबईचा फैसला आज होणार; ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार?.
महायुती की ठाकरे बंधू? मुंबईचा एक्झिट पोल काय? पाहा व्हिडीओ
महायुती की ठाकरे बंधू? मुंबईचा एक्झिट पोल काय? पाहा व्हिडीओ.
मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला! काय लागणार निकाल?
मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला! काय लागणार निकाल?.
महापालिका निवडणूकीत कोण मारणार बाजी?पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर
महापालिका निवडणूकीत कोण मारणार बाजी?पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर.
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.