यूएईतील उद्योजकामुळे आयुष्याची ‘डोर’ बळकट, एक कोटींमुळे भारतीय तरुणाचा मृत्युदंड टळला

यूएईतील भारतीय उद्योजकाने दिलेले एक कोटी स्वीकारुन कृष्णनची शिक्षा माफ करण्यास सुदानी कुटुंब तयार झाले. (Yusuff Ali pays blood money )

यूएईतील उद्योजकामुळे आयुष्याची 'डोर' बळकट, एक कोटींमुळे भारतीय तरुणाचा मृत्युदंड टळला
युसुफ अली
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 12:46 PM

अबूधाबी : मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या केरळातील 45 वर्षीय व्यक्तीची अखेर संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून सुटका झाली. अबुधाबीतील लुलु ग्रुपचे अध्यक्ष (LuLu group) आणि अब्जाधीश एनआरआय उद्योजक एम ए युसुफ अली (M A Yusuff Ali) यांच्या मध्यस्थीमुळे तरुणाचा मृत्युदंड टळला. केरळातील थ्रिसूरमध्ये राहणाऱ्या कृष्णनला अबुधाबीतील कोर्टाने शिक्षा सुनावली होती. (NRI businessman of LuLu group Yusuff Ali pays blood money to save Indian Man in Abu Dhabi)

नेमकं काय घडलं?

7 सप्टेंबर 2012 रोजी कृष्णनच्या कारने दिलेल्या धडकेत सुदानच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी कृष्णन अबुधाबीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये यूएईच्या सुप्रीम कोर्टाने कृष्णनला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच शिक्षा भोगत आहे. कृष्णनच्या कुटुंबीयांनी त्याच्या सुटकेसाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु त्यांना कुठलाही दिलासा मिळत नव्हता. अशातच कृष्णननेही आशा सोडली होती.

किती पैसे मोजले?

दुसरीकडे, एनआरआय उद्योजक एम ए युसुफ अली यांनी मुलगा गमावलेल्या सुदानी कुटुंबाला पैसे देण्याची ऑफर दिली. पाच लाख दिराम (99 लाख 35 हजार 271 रुपये) इतके ब्लड मनी (blood money) स्वीकारुन कृष्णनची शिक्षा माफ करण्यास सुदानी कुटुंब तयार झाले. ब्लड मनी म्हणजेच एखाद्याच्या जीवासाठी मोजलेली रक्कम. त्यामुळे कृष्णन आठवड्याच्या अखेरीस भारतात परतणार आहे.

युसूफ अली यांची संपत्ती किती?

एनआरआय उद्योजक एम ए युसुफ अली यांची एकूण संपत्ती 490 कोटी यूएस डॉलर (35 हजार 765 कोटी रुपये) इतकी असल्याची माहिती गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकाने दिली होती. त्यापैकी 1 लाख 36 हजार 129 यूएस डॉलर (अंदाजे एक कोटी रुपये) त्यांनी कृष्णनसाठी सुदानी कुटुंबाला दिले.

डोर चित्रपटाशी साधर्म्य

दरम्यान, काही आखाती देशांमध्ये अशा प्रकारे शिक्षा माफ करण्याची कायद्यात तरतूद आहे. नागेश कुकूनूर दिग्दर्शित ‘डोर’ या चित्रपटात असेच कथानक दाखवण्यात आले होते. आशिया टाकिया, श्रेयस तळपदे, गुल पनाग यांच्या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. गुलने साकारलेल्या झीनतला आपल्या पतीची मृत्युदंडाची शिक्षा मयत तरुणाच्या कुटुंबाकडून माफ करुन घ्यायची असते. त्यामुळे ती आयेशाने साकारलेल्या तरुणाच्या पत्नीच्या, मीराच्या माफीनाम्याच्या प्रतीक्षेत असते, असं या सिनेमाचं कथानक होतं.

संबंधित बातम्या :

हनिमून कपलला काकीने ड्रग्ज प्रकरणात अडकवले, दाम्पत्य दोन वर्षांनी बाळासह कतारहून मुंबईला

(NRI businessman of LuLu group Yusuff Ali pays blood money to save Indian Man in Abu Dhabi)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.