AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडी चालवताय, तर सावधान, पत्नी-मुलांसमोर असं कुणी जावू नये

मुंबईतील कांजूरमार्ग येथे राहणारे विजय मंगल पाटील हे आपल्या कुटुंबासोबत आज मुंबईहून पुण्याला फिरण्यासाठी चालले होते. यावेळी गाडीत विजय पाटील, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले उपस्थित होते.

गाडी चालवताय, तर सावधान, पत्नी-मुलांसमोर असं कुणी जावू नये
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 05, 2022 | 7:53 PM
Share

नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार एका कठड्याला जाऊन धडकली आणि पलटी झाली. विजय मंगल पाटील असे 57 वर्षीय मयत चालकाचे नाव आहे. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचावकार्य सुरु केले. चालकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पुण्याला फिरायला चालले होते पाटील कुटुंब

मुंबईतील कांजूरमार्ग येथे राहणारे विजय मंगल पाटील हे आपल्या कुटुंबासोबत आज मुंबईहून पुण्याला फिरण्यासाठी चालले होते. यावेळी गाडीत विजय पाटील, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले उपस्थित होते.

खोपोलीजवळ कारचे नियंत्रण सुटले अन्…

मुंबई-पुणे एक्प्रेसवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार एका कठड्याला जाऊन धडकली आणि पलटी झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

चालकाचा जागीच मृत्यू, पत्नी आणि मुले किरकोळ जखमी

कारमधील पत्नी आणि दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखतच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेच्या पथकातील विजय भोसले आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चालकाचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?