AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Crime News : बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पाण्यात घेतली उडी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या…

काल गटारी साजरी करण्यासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला आहे. विशेष म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Palghar Crime News : बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पाण्यात घेतली उडी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या...
palghar videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2023 | 3:09 PM
Share

पालघर : पालघरमध्ये (Palghar Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पर्यटक बुडत असल्याचे पाहून कर्मचाऱ्याने उडी मारली. त्याचा वाचवण्याच्या नादात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जव्हार मधील दाभोसा धबधबा (dabhosa waterfall) येथे ही दुर्घटना घडली आहे. देवेंद्र शिंदे (devendra shinde) असं त्या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथक तिथं दाखल होतं. शिंदे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात गटारी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अधिक घटना या धबधब्याजवळ घडल्या आहेत.

पालघरमधील जव्हार मधील दाभोसा धबधबा येथे एका बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून देवेंद्र शिंदे असं या लिपिकाच नाव आहे .

शिंदे हे जव्हार पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक लिपिक म्हणून कार्यरत होते. काल आपल्या मित्रांसोबत जव्हार मधील दाभोसा धबधबा येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी एक पर्यटक बुडत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर आपल्या जीवाची परवा न करता त्यांनी या पर्यटकाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

मात्र वाचवण्यासाठी गेलेल्या लिपिक देवेंद्र शिंदे यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

तीनशे फुटांपेक्षा जास्त उंचीवरून कोसळणाऱ्या दाभोसा धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत होते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना किंवा सूचनाफलक लावण्यात आले नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.