खदानी कामगार जेवण झाल्यानंतर घराबाहेर, दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरमध्ये मृतदेह आढळला

हा मृतदेह जाळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पोस्टमोर्टम करण्यासाठी ताब्यात घेतला. (Palghar stone mine worker dead body found)

खदानी कामगार जेवण झाल्यानंतर घराबाहेर, दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरमध्ये मृतदेह आढळला
प्रातिनिधिक फोटो

पालघर : पालघरमधील दगड खाणीत 35 तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अनिल डोकफोड असे या तरुणाचे नाव आहे. पालघरमधील वाडा तालुक्यातील शेल्टे गावाच्या शेजारी ही घटना घडली. विशेष म्हणजे या खदान मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्या व्यक्तीचा मृतदेह थेट त्याच्या घरी आणून दिला. नातेवाईक हा मृतदेह जाळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पोस्टमोर्टम करण्यासाठी ताब्यात घेतला. (Palghar stone mine worker dead body found)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल डोकफोडे हा त्याच्या घराशेजारील एका कंपनीत कामाला होता. बुधवारी 10 मार्चला अनिल डोकफोडे हा संध्याकाळी कामावरुन आल्यानंतर घरी आला. त्यानंतर त्याने जेवण केले. मात्र त्याला कोणाचा तरी फोन आल्याने तो रात्री घराच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर तो रात्री घरीच परतला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी खदानीतील काही कामगारांनी अनिलचा मृतदेह ट्रक्टरमध्ये आढळला. मात्र खदान मालकाने याबाबतची माहिती पोलिसांना कळवली नाही. त्यानंतर तो मृतदेह थेट अनिल डोकफोडे यांच्या घरी आणून दिला. त्यांचा मृतदेह घरातील कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.

मालकाने मृतदेह थेट घरी आणून दिला

दरम्यान या घटनेनंतर खदान मालकाने पोलिसांना याबाबतची माहिती देणे आवश्यक होते. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुनच तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला हवा होतो. पण त्या मालकाने तसे न करता थेट अनिलचा मृतदेह घरी आणून दिला. तसेच त्याचे नातेवाईक मृतदेह जाळण्याच्या तयारीत असताना वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान अनिल डोकफोडे याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी वर्तविला आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली होती. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती आणि प्रतिक्रिया देण्यात येऊ नये अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. (Palghar stone mine worker dead body found)

संबंधित बातम्या : 

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त

पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी

Published On - 7:00 am, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI