चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त

काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे गेल्या अनेक महिन्यांपासून दारु तस्करीत सामील असल्याची चर्चा होती. (Chandrapur Congress Corporator Alcohol Seized)

चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त
प्रातिनिधीक फोटो

चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त करण्यात आली. नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. भर्रेंच्या घरातून 100 पेटी दारु जप्त झाल्याचं वृत्त पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश भर्रे हे चंद्रपुरातील प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक आहेत. (Chandrapur Congress Corporator Mahesh Bharre Alcohol Seized)

महेश भर्रे हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात राहतात. भर्रे यांच्या घरातून काल रात्री उशिरा दारुसाठा जप्त करण्यात आला. मुंबईहून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली.

दारु तस्करीत सहभागाची चर्चा

काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे गेल्या अनेक महिन्यांपासून दारु तस्करीत सामील असल्याची चर्चा होती. राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचंही बोललं जात होतं. पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल, अटक नाही

महेश भर्रे आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु नगरसेवक भर्रे कारवाईच्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्यांना सध्या अटक करण्यात आलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते. मात्र, याचा नमुना आज बघायला मिळाला. (Chandrapur Congress Corporator Alcohol Seized)

विषारी दारु निर्मितीविरोधात पावलं

दरम्यान, चंद्रपुरात विषारी दारु निर्मिती तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महेश भर्रे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ज्या कर्मचार्‍यांच्या आशीर्वादाने हा बेकायदेशीर व्यवसाय सुरु आहे, त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणीही भर्रेंनी केली होती.

चंद्रपुरात अपक्ष आमदाराने दारुसाठा पकडला

चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहराच्या एंट्री पॉईंटवर शहरात येणारा 7 पिकअप वाहन भरुन देशी दारुचा साठा पकडला होता. पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी जिल्ह्यात बेधडक येणारे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

फळ विक्रीच्या क्रेटखाली देशी दारुची तस्करी, 2 लाख 80 हजारांचा साठा जप्त

(Chandrapur Congress Corporator Mahesh Bharre Alcohol Seized)

Published On - 3:49 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI