AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढ

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.

अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढ
पंढरीनाथ फडके यांच्या पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढ
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 21, 2022 | 10:31 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 33 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ फडके आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनाही मोठा झटका बसला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव असून, पोलीस संपूर्णपणे एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.

पंढरीनाथ फडकेंसह 33 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 33 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मला राजकीय वादातून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप फिर्यादी राहुल पाटील यांनी केला होता. यामुळे कुणाल पाटील आणि त्यांच्या दोन भावांचाही समावेश आरोपींमध्ये करण्यात आला होता. मात्र त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.

तर दुसरीकडे पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 10 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. यापैकी पंढरीनाथ फडके आणि अन्य दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पंढरीनाथ फडकेंच्या पोलीस कोठडीत वाढ

ती कोठडी संपल्यानंतर आज या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने फडके यांच्यासह अन्य दोघांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यावेळी फडके यांच्यावतीने अॅडव्होकेट मानसी म्हात्रे, अॅडव्होकेट सत्यन पिल्ले आणि अॅडव्होकेट उमेश केदार यांनी युक्तिवाद करत पंढरीनाथ फडके हे तपासात संपूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले.

तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका आणि गाड्या जप्त करण्यात आल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. तर पोलिसांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने या तिघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यावेळी सरकारी वकील आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी न्यायालयात या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायला पोलीस आयुक्तांनी मान्यता दिल्याचे आदेश न्यायालयाला सादर केले. त्यामुळे फडके गटाला मोठा झटका बसलाय.

मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह सर्व 33 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना आधी 14 दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीची कारवाई प्रस्तावित आहे.

पोलीस एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणात पोलीस सुरुवातीपासून एकतर्फी तपास करत असून पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप अॅड. मानसी म्हात्रे यांनी केला आहे. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत इतर आरोपांवर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय तपास हा कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचं सांगितलं आहे.

मात्र मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. यातील अंतरिम जामीन मिळालेले माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्याही अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आरोपींचे वकील आता याबाबत वरच्या न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....