मुंबईत भाजी विकण्याच्या बहाण्याने गांजा विक्रीचा व्यवसाय; उच्चशिक्षीत तरुणाला अटक

भाजी विकण्याच्या बहाण्याने कुरारमध्ये तो गांजा विकत असे. | ganja crime

मुंबईत भाजी विकण्याच्या बहाण्याने गांजा विक्रीचा व्यवसाय; उच्चशिक्षीत तरुणाला अटक
या गांजाची किंमत जवळपास 9,45,000 इतकी आहे.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:07 PM

मुंबई: मालाडच्या कुरार परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून 63 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बाजारपेठेत या गांजाची (Ganja smuggling) किंमत जवळपास 9 लाख इतकी आहे. (Police arrestd mumbai youth sellin ganja in kadivli)

अटक करण्यात आलेल्या तरुणाने सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. उच्चशिक्षित असूनही तो गांजाच्या तस्करीचा व्यवसाय करायचा. भाजी विकण्याच्या बहाण्याने कुरारमध्ये तो गांजा विकत असे. होळीच्या सणाला विकण्यासाठी या तरुणाने मोठ्याप्रमाणावर गांजा आणला होता. पोलिसांना छाप्यात गांजाच्या तीन गोण्या मिळाल्या. या गांजाची किंमत जवळपास 9,45,000 इतकी आहे.

कोरोनामुळे शाळा बंद पडली, आर्थिक संकट ओढावल्याने शिक्षक गांजा तस्करीच्या व्यवसायात

कोरोना संकटामुळे शाळा बंद पडल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या तेलंगणामधील एक शिक्षक गांजाची तस्करी करत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या शिक्षकाला नागपूर पोलिसांनी नुकतीच अटक झाली. त्यानंतर गांजाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता.

नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी या शिक्षकाला गांजा तस्करी करत असताना नागपुरात अटक केली. त्याच्याकडून थोडाथोडका नव्हे 92 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत जवळपास 13 लाख रुपये इतकी आहे.

कारने व्हायची गांजाची तस्करी

शिवशंकर इस्मपल्ली हा तेलंगणाच्या वारांगना येथे एका शाळेत शिक्षक म्हणून काम करायचा. मात्र, कोरोना संकटामुळे शाळाच बंद पडली. त्यामुळे या शिक्षकावर आर्थिक संकट ओढावले. यामधून मार्ग काढण्यासाठी त्याने गांजा तस्करीचा पर्याय निवडला. आरोपी शिक्षक वारंगल ते दिल्ली अशा रॅकेटमध्ये सामील झाला. रस्तेमार्गे खेप पोचवत असताना तो नागपूरच्या वर्धा मार्गावर बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागला.

पोलीस उपायुक्त डॉक्टर अंकुश शिंदे यांना नागपूर मार्गे गांजाची खेप जाणार असल्याची माहिती मिळाली. वारंगल ते दिल्ली असा मार्ग असल्याने बेलतरोडी पोलिसांनी सतर्क करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या वर्धा मार्गावर सापळा रचण्यात आला. एका गाडीवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. पण गाडी चालकाने थांबवली नाही. अखेर पोलिसांनी पाठलाग करुन काही अंतरावर जाऊन गाडी थांबवण्यात यश मिळवले. त्यानंतर गाडीची झडती घेण्यात आली त्यातून 92 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 13 लाख रुपये आहे तर गाडीची किंमत पाच लाख रुपये असा एकूण 18 लाखाचा माल बेलतरोडी पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या:

केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई

(Police arrestd mumbai youth sellin ganja in kadivli)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.