Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता

वसई विरार भाईंदरमध्ये अनेक कारणामुळे मुलांनी घरं सोडलं आहे. त्यांच्या घरच्यांनी घर का सोडलं याची देखील तक्रार दिली आहे. संबंधित मुलाची माहिती घेतल्याशिवाय पोलिस तपासाला सुरुवात करीत नाही.

Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता
Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता
Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 12, 2022 | 8:45 AM

विरार – विरार पोलिसांच्याकडून (Virar Police) राबविण्यात येणाऱ्या मुस्कान मोहिम (Muskan Policy) अंतर्गत आत्तापर्यंत अनेक मुला मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. विरारमध्ये जानेवारी महिन्यांपासून जुलै महिन्यापर्यंत पोलिसांनी मुस्कान मोहिम राबिवली. त्यामध्ये त्यांनी 361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं पालकांच्या स्वाधीन केली आहेत. अद्याप उरलेला मुलांचा पोलिस शोध घेत असून अजून काही दिवस ही मोहीम राबिवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मागच्या जानेवारीपासून (January) मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी पोलिसांनी मुस्कान मोहिम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत बरीच मुल घरी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली असल्याने पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं शोधण्यात यश

वसई विरार भाईदर या परिसरातून मुलं गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे. प्रत्येक मुलासाठी विशेष मोहिम राबिवली जात आहे. त्यामुळे पोलिसांना 361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं शोधण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ही मोहिम राबविली जाते. महाराष्ट्रातील पोलिसांनी ही मोहिम हाती घेतल्यापासून अनेक मुलं त्यांच्या मुळ घरी पुन्हा परतली आहेत. तसेच पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी पोलिसांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रकरणात पोलिसांनी मदत केली आहे. त्यामुळे अनेक प्रकरणात मुलांना शोधण्यात यश आले आहे.

हे सुद्धा वाचा

बेपत्ता होण्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे

वसई विरार भाईंदरमध्ये अनेक कारणामुळे मुलांनी घरं सोडलं आहे. त्यांच्या घरच्यांनी घर का सोडलं याची देखील तक्रार दिली आहे. संबंधित मुलाची माहिती घेतल्याशिवाय पोलिस तपासाला सुरुवात करीत नाही. बेपत्ता होण्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे, तर मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक प्रकरणात वेगळं कारण आहे. अनेकदा आई वडिलांनी रागावल्यामुळे मुले गायब झाली आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें