Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार

आता पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

  • महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 18:38 PM, 2 Mar 2021
Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार
lahu chavan_Shanta Rathod

बीड: पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवे नवे ट्विस्ट येत आहेत. भाजपने आरोप केल्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पूजाच्या कुटुंबातच वाद उफाळला आहे. कारण आता पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Pooja Chavan father Lahu chavan file complaint against Shanta Rathod)

लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार पोलिसात केली आहे.

शांताबाई राठोड यांचा नेमका आरोप काय? 

“शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.

पूजाचे वडील काय म्हणाले? 

पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी 5 कोटी रुपये घेतल्याचे आरोप फेटाळले. पूजाच्या आई-वडिलांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत लहू चव्हाण म्हणाले, “कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत”

संबंधित बातम्या 

Pooja Chavan death case : चुलत आजी म्हणाली, पूजाच्या वडिलांनी 5 कोटी घेतले, आता लहू चव्हाण म्हणतात..

पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप, 50000000 घेतल्यामुळे पूजाच्या आई-वडिलांचं तोंड गप्प

(Pooja Chavan father Lahu chavan file complaint against Shanta Rathod)