AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रफुल्ल पटेल यांची कतारच्या राजघराण्याकडे पैशांची मागणी? सायबर सेलने केली कारवाई

कतारमधील राजघराण्याकडून पैशांची मागणी करणारा एक मेसेज अजित गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पाठविला. 20 जुलै रोजी हा मेसेज पाठविण्यात आला. राजघराण्यातील कुटुंबाला या मेसेजवर संशय आला. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि...

प्रफुल्ल पटेल यांची कतारच्या राजघराण्याकडे पैशांची मागणी? सायबर सेलने केली कारवाई
PRAFULL PATELImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 28, 2024 | 3:20 PM
Share

कतार येथील राजघराण्याला पैशांची मागणी करणार एक मेसेज 20 जुलै रोजी मिळाला. हा मेसेज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने आला होता. प्रफुल्ल पटेल हे स्वतः उद्योगपती आहेत. एक बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांना पैशांची गरज का भासली असेल असा विचार करून त्या राजघराण्यातील कुटुंबाने प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि एक मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. प्रफुल्ल पटेल यांनी या फसवणुकीची माहिती सायबर सेलला कळवली. त्यानंतर सायबर सेलने आयटी ॲक्ट 66 डी अंतर्गत एफआयआर नोंदवला.

महाराष्ट्रामध्ये सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सायबर फसवणुकीची अशी दोन प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस आली आहेत. यातील एका प्रकरणात तब्बल 40 कोटींची चोरी झाली आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आले आहे. राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने सायबर घोटाळेबाजाने एक व्हीआयपी क्रमांक खरेदी केला. त्यानंतर आरोपीने प्रफुल्ल पटेल यांचा प्रोफाईल फोटो सोशल मीडिया हँडल व्हॉट्सॲपवर पोस्ट केला.

गुन्ह्याची ही पहिली पायरी गाठल्यानंतर आरोपीने कतारच्या राजघराण्याकडे पैशांची मागणी करणारा मेसेज केला. सायबर स्कॅमरला वाटले की कतारचे रॉयल फॅमिली आपल्या फसवणुकीला ओळखणार नाही. परंतु, तसे काही झाले नाही. त्या कुटुंबाला आरोपीच्या या मेसेजवर संशय आला. स्वतः उद्योगपती आणि नेते असलेले प्रफुल्ल पटेल हे पैशांची मागणी करतील याचा त्या कुटुंबालाच विश्वास बसत नव्हता. अखेर, त्या कुटुंबाने प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती पटेल यांना दिली.

प्रफुल्ल पटेल यांनी सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार केली. सायबर सेलने या घटनेचा तपास तातडीने हाती घेतला. या प्रकरणी सायबर सेलने तपास सुरू करून आरोपी राहुल कांत याला अटक केली. आरोपी राहुल कांत हा मुंबईतील पॉश एरिया जुहू येथे राहत होता. सायबर सेलच्या तपासादरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे अशी माहिती सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं