Assault Case : कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणावरील हल्ला प्रकरण, आतापर्यंत 14 आरोपींना अटक

सनी पवार शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबले होते. त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज, काठ्या, हॉकीची स्टिक, तलवार यांच्या साह्याने हल्ला केला.

Assault Case : कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणावरील हल्ला प्रकरण, आतापर्यंत 14 आरोपींना अटक
आतापर्यंत 14 आरोपींना अटकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 5:43 PM

अहमदनगर : कर्जत येथील प्रतीक पवार (Prateek Pawar) या तरुणावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आणखी 8 जण ताब्यात घेण्यात आले. काल 6 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 14 झाली आहे. कर्जत शहरात प्रतीक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर हल्ला करण्यात आला. घडलेल्या घटने प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Superintendent of Police Manoj Patil) यांनी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला प्रतीकवर हल्ला केला होता. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार (Treatment at a private hospital) सुरू आहेत.

कर्जतमध्ये काही काळ बंद

अहमदनगरला कर्जत शहरात प्रतीक राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत शहरांमध्ये काही वेळ बंद पाळण्यात आला. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला दोघा जणांना अटक करण्यात आली. आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अशी घडली घटना

सनी पवार शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबले होते. त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज, काठ्या, हॉकीची स्टिक, तलवार यांच्या साह्याने हल्ला केला. यामध्ये सनी पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा हल्ला का करण्यात आला. याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळं हल्ला करणं या गटाला चांगलंच भोवलं आहे. पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं. त्यामुळं आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आपसी मतभेदातून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.