AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sriharikota : सर्वात लहान उपग्रह SSLV अयशस्वी, आता ISRO ने सांगितलं चूक नेमकी काय झाली

रविवारी मिशनमध्ये SSLV च्या माध्यमातून ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आणि सहयात्री उपकरण आझादीसॅट पाठविण्यात आलं. याला स्पेस किड्स इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या चमूनं विकसित केलं होतं.

Sriharikota : सर्वात लहान उपग्रह SSLV अयशस्वी, आता ISRO ने सांगितलं चूक नेमकी काय झाली
सर्वात लहान उपग्रह SSLV अयशस्वी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 07, 2022 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) उपग्रहाशी संपर्क तुटण्याचं कारण ओळखलं. याशिवाय इस्रोनं विश्लेषण आणि सुधारणेसंबंधी शिफारशींसाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. इस्रोने उपग्रह SSLV-D1 शी संपर्क तुटण्या प्रकरणी सांगितलं की, हे उपग्रह उपयोग करण्यायोग्य राहिले नाही. याच्या विश्लेषण आणि शिफारशींसाठी समिती गठित करण्यात आली. इस्रोने आपलं पहिलं सॅटेलाईट लाँच व्हेईकल मिशन (SSLV) लाँच केलं होतं. याचा एक अर्थ ऑर्जर्व्हेशन सॅटेलाईट आणि एक स्टुडंट सॅटेलाईटचं उड्डाण भरलं होतं. या ऐतिहासिक मिशनला जवळपास १३५ किलोमीटरवरील श्रीहरीकोटा येथील स्पेस लाँच सेंटरला सुरुवात करण्यात आली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितलं की, SSLV रॅकेटची सुरुवात यशस्वी झाली. रॅकेटने सॅटेलाईट EOSO2 आणि AzaadiSAT ला त्यांच्या कक्षेत पोहचविलं. त्यानंतर रॅकेट वेगळा झाला. परंतु, दोन्ही सॅटेलाईट्सकडून कोणत्याही प्रकारचा डाटा मिळणे बंद झालं.

लहान सॅटेलाईट लाँचरकडून लाँचिंग

पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (PSLV) जिओस्टेशनरी सॅटेलाईट लाँच व्हेईकल (GSLV) च्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी जागा बनविण्यात आली. त्यानंतर लहान सॅटेलाईट लाँच व्हेईकलने पहिली लाँचिंग करण्यात आली. याचा वापर पृथ्वीच्या खालील भागात सॅटेलाईटला स्थापन करणे होता. इस्रोच्या वैज्ञानिकांनी लहान सॅटेलाईट लाँचिंग करण्यासाठी गेल्या काही दिवसांत मिनी लाँच व्हेईकल (यान) विकसित केलं. त्याचं वजन पाचशे किलो होतं. तो पृथ्वीच्या खालील भागात स्थापित करायचं होतं. SSLV ३४ मीटर लांब आहे. PSLV पेक्षा जवळपास 10 मीटर कमी लांब आहे. SSLV चे द्रव्यमान 120 टन आहे. PSLV चे द्रव्यमान 320 टन आहे. यामधून 1 हजार 800 किलो उपकरण नेले जाऊ शकतात.

श्रीहरीकोटावरून केले लाँच

रविवारी मिशनमध्ये SSLV च्या माध्यमातून ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आणि सहयात्री उपकरण आझादीसॅट पाठविण्यात आलं. याला स्पेस किड्स इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या चमूनं विकसित केलं होतं. इस्रोच्या सूत्रानुसार, पाच तासांचा रन ठेवण्यात आला होता. रविवारी याला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राने सुरुवातीला सकाळ 9.18 मिनिटांनी लाँच केलं होतं. जवळपास 13 मिनिटांच्या प्रवासानंतर SSLV सर्वात पहिल्यांदा EOS-02 कक्षेत स्थापित झालं. या सॅटेलाईटला इस्रोद्वारे डिझाईन केलं होतं. त्यानंतर आझादीसॅटला पृथ्वी कक्षेत स्थापित केलं होतं. हे सॅटेलाईट 8 किलो क्युबसॅट आहे. याला देशातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षानिमित्त डिझाईन केलं होतं. आझादीसॅटमध्ये 75 वेगवगेळे उपकरणं आहेत. त्यात प्रत्येकाचे वजन सुमारे 50 ग्राम आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?