Pritish Deshmukh: एक कोटी तीस लाखांचा प्लॉट आणि दीड कोटीची ‘मर्सीडीज’, प्रीतीशचा राजेशाही थाट बघून सगळेच अवाक

डॉ.प्रीतीश देशमुख याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनी सुरु केली. आणि त्यातूनच प्रीतीशने कोटी रुपयांची माया जमविणे सुरु केले. पेपरफुटी प्रकरण पुढे आल्यावर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे.

Pritish Deshmukh: एक कोटी तीस लाखांचा प्लॉट आणि दीड कोटीची ‘मर्सीडीज’, प्रीतीशचा राजेशाही थाट बघून सगळेच अवाक
प्रीतीशचा राजेशाही थाट बघून सगळेच अवाक
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:16 PM

वर्धा : सामान्य कुटुंबातून वर आलेला एखादा युवक अचानक राजेशाही थाटात राहायला लागला. एवढंच नव्हे त्याची कोट्यावधींची मालमत्ता आणि महागाड्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्याने सगळेच अवाक झाले. आरोग्य विभागासह टीईटी परिक्षेच्या पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार डॉ. प्रीतीश देशमुख याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर वर्ध्यातही त्याच्या संपत्तीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रीतीशने दोन वर्षात करोडोची जमिन आणि कार खरेदी केली

प्रीतीशने मागील दोन वर्षांत त्याच्या स्नेहलनगर परिसरातील निवासस्थानालगतच सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयांची 8 हजार स्क्वेअरफूट जागा आणि दीड कोटी रुपयांची मर्सीडीज बेन्झ ही आलिशान कार खरेदी केल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे प्रीतीशची स्थावर मालमत्ता आहे तरी किती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. प्रितीश वैद्यकीय शिक्षणादरम्यान हॉस्टेलला न राहता बाहेर आलिशान हॉटेलमध्ये राहत असल्याचीही माहिती आहे.

पेपरफुटी प्रकरण उघडकीस झाल्यानंतर संपत्तीचा खुलासा

डॉ.प्रीतीश देशमुख याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनी सुरु केली. आणि त्यातूनच प्रीतीशने कोटी रुपयांची माया जमविणे सुरु केले. पेपरफुटी प्रकरण पुढे आल्यावर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे. त्याच्याजवळ पाच ते सात आलिशान गाड्या असून त्याने दोन आलिशान गाड्यांच्या व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठीही दीड ते दोन लाख रुपये आरटीओत मोजल्याचे आता उघड झाले आहे. डॉ.प्रीतीश याने आणखी कुठे मालमत्ता खरेदी केली, याचा शोधही घेण्याची गरज आहे. डॉ. प्रीतीश याने वैद्यकीय शिक्षण नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. मात्र, तो फायनल इअरमध्ये एक वर्ष फेल झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर तो हॉस्टेलला न राहता बाहेर आलिशान हॉटेलमध्ये राहत होता, अशी माहितीही पुढे येऊ लागली आहे. (Preetish bought land and cars worth crores in two years)

इतर बातम्या

VIDEO : पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; अंबरनाथमध्ये टोळक्याची दादागिरी

Dombivali Crime: चाकूच्या धाकाने बँक मॅनेजरला लूटले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.