पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

सांगलीच्या जिल्हा कारागृहात एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?
suicide

सांगली : सांगलीच्या जिल्हा कारागृहात एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना आज (1 ऑगस्ट) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मृतक संशयित आरोपीचं नाव सचिन नागप्पा कांबळे (वय 21) असं होतं. या घटनेमुळे सांगली जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे याच कारागृहात गेल्या तीन महिन्यात दोन कैद्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जून महिन्यापासून अटक

मृतक कैदी सचिन कांबळे याला पोक्सो कायद्यातील संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तो गेल्या एक महिन्यापासून कारागृहात कैद होता. तो मुळचा जत तालुक्यातील सोसवड गावचा रहिवासी होता. त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जून महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याला कोर्टात सादर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरु होता.

पहाटे पाच वाजता गळफास घेऊन आत्महत्या

सांगली जिल्हा कारागृहात पहाटे पाच वाजण्याचा सुमारास लाईट गेली होती. याच वेळी अंधारात कैदी सचिन याने चादर जेलमधील अँगलला लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक कैदी लघुशंकेसाठी उठला. यावेळी त्याला सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तातडीने कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

कैद्याने आत्महत्या का केली?

सचिनला तातडीने सांगलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी सचिनला मृत घोषिक केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेत सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान, कैद्याने स्वत:ला का संपवलं याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

हेही वाचा :

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात हत्येचा थरार, भर दिवसा सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळ्या

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI