कोण हिंदू, कोण मुस्लीम? कल्याणमध्ये लव्ह जिहादची चर्चा, हिरॉईन म्हणते नवऱ्याने ओळखच लपवली

अभिनेत्री प्रिती तलरेजाने तिचा पती अभिजीत पेटकर असल्याचा आरोप केलाय मात्र, पेटकरनं आरोप फेटाळले आहेत. (Priti Talreja Abhijeet Petkar)

कोण हिंदू, कोण मुस्लीम? कल्याणमध्ये लव्ह जिहादची चर्चा, हिरॉईन म्हणते नवऱ्याने ओळखच लपवली
प्रिती तलरेजा अभिजीत पेटकर
Yuvraj Jadhav

|

Jan 07, 2021 | 3:09 PM

कल्याण: अभिनेत्री प्रिती तलरेजानं (Priti Talreja)तिच्या पतीवर मुस्लीम असल्याचा आरोप केला आहे. पतीनं मानसिक आणि शारीरीक त्रास दिल्याची पोस्ट प्रिती तलरेजानं सोशल मिडियावर व्हायरल केली आहे. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. मात्र, पती अभिजीत पेटकर यानं मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा प्रितीचा आरोप फेटाळून लावला आहे. (Priti Talreja accused her husband Abhijeet Petkar is Muslim)

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या प्रिती तलरेजा या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर आपला पती अभिजीत पेटकर विरोधात पोस्ट व्हायरल करत गंभीर आरोप केला आहे. प्रितीने पती अभिजीतने आपली ओळख लपवून मुस्लीम धर्मगुरुसमोर मशिदीत लग्न केले. तो आत्ता मला मानसिक आणि शारीरीक त्रास देतोय. मात्र, जीम ट्रेनर अभिजीत पेटकर याने पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

अभिजीतनं आरोप फेटाळले

अभिजीत पेटकर यानं याविषयी बोलताना “मी हिंदू आहे. मी मुस्लीम धर्म स्वीकारलेला नाही”, असं म्हटलं आहे. “फायटर मोहम्मद अली यांचा फॅन आहे. मुस्लीम कल्चर चांगले वाटते. मी म्हणजे मुस्लीम झालेलो नाही, असही पेटकर म्हणला. पती-पत्नी दोघांनी कॅमेरे समोसे बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, या प्रकरणी प्रिती तलरेजाच्या तक्रारीवर खडकपाडा पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा पती अभिजीत पेठकर विरोधात दाखल केला आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

प्रिती तलरेजा हिनं पोलीस स्टेशनला पती अभिजीत पेटकर विरोधात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रिती तलरेजानं पती विरोधात आरोप केले असले तरी पोलिसांनी अभिजीत पेटकर हा हिंदू असल्याचं स्पष्ट केले आहे. अभिजीतला मुस्लीम संस्कृतीबद्दल आकर्षण आहे. पण, त्यानं मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचं खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. प्रिती तलरेजानं तिच्या पतीविरोधात केलेल्या आरोपानंतर यामध्ये लव्ह जिहादचा अँगलचा आहे का? हे पोलीस तपासानांतर स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या:

ताज महल परिसरात भगवा फडकवला; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Budaun | उत्तर प्रदेशात 50 वर्षीय महिलेची गँगरेपनंतर हत्या, 2 संशयित आरोपी अटकेत

(Priti Talreja accused her husband Abhijeet Petkar is Muslim)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें