AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vanraj Aandekar Murder : घोर कलियुग! पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरचा सुपुत्र वनराज यांची सख्या बहिणीकडूनच सुपारी

पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. या हत्येमागे त्यांचीच सख्खी बहीण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनराज हे कुख्यात गुंड बंडु आंदेकर यांचे सुपुत्र होते. बहिणीचे आपल्या भावाची सुपारी का दिली? संपूर्ण स्टोरी जाणून घ्या .

Vanraj Aandekar Murder : घोर कलियुग! पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरचा सुपुत्र वनराज यांची सख्या बहिणीकडूनच सुपारी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2024 | 5:56 PM
Share

विद्येचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुणे शहरातील नाना पेठमधील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. 1 सप्टेंबर रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या घराजवळ उभा असलेल्या वनराज आंदेकरांवर गोळीबार झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्यांना जागीच संपवलं. नाना पेठ डोके तालीमजवळ हा सर्व प्रकार घडला. चार-पाच दुचाकीवर आलेल्या दहा ते बारा जणांनी वनराज यांचा मर्डर केला. या घटनेमुळे परत एकदा पुण्यातील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचं दिसत आहे.

वनराज आंदेकर यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर कुख्यात गुंड आहे. पुण्यामधील नाना पेठेतील आंदेकर यांची टोळी प्रसिद्ध आहे, या टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर. बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मात्र जानेवारीमध्ये तो जामीनावर बाहेर आलाय.  बंडू आंदेकर याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. संपत्तीच्या वादातूनच वनराज यांची हत्या झाली. वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच दोन बहिणी आणि मेहुण्यांनी केला.  पुण्याचे शहर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना या हत्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली आहे.

वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणींमध्ये संपत्तीवरून वाद होता. गणेश कोमकर याला नाना पेठेमधील एक दुकान दिले गेले होते. मात्र ते दुकान महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. यावरून दोन्ही कुटूंबात वाद सुरू होता. जावई गणेश कोमकर यानेही आपली गँग तयार केली होती. आंदेकर यांच्याच नावाचा फायदा घेऊन तो गुंडगिरी करत होता. आंदेकरांच्या एका माणसासोबत त्याचं भांडण झालं होतं. या भांडणामध्ये गणेश कोमकरला मारहाण झाली होती. दुकाने पाडले गेल्याने आणि या भांडणामध्ये झालेल्या मारहाणीच्या रागातून दोन्ही कुटूंबातील तणाव वाढला होता. यादरम्यान तुला पोरं बोलवून ठोकते अशी धमकी वनराज यांना त्यांच्या बहिणीने दिली होती.

याच घरगुती संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीनेच आपल्याच भावाची सुपारी दिली. जयंत कोमकर, गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड याला वनराज यांची सुपारी दिल्याची माहिती समजली आहे. रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यानंतर ते नऊच्या सुमारास आपल्या चुलत भावासह खाली उभे राहिले होते. त्यावेळी अचानाक दुचाकीवाले त्यांच्याजवळ आले आणि गोळीबार करू लागले. जवळपास दहा ते बारा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पाच राऊंड फायर केले त्यानंतर काहींनी आपल्या शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्यावर वार केले.

दरम्यान, वनराज आंदेकर यांचे वडील म्हणजेच कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वनराज यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींच्या सांगण्यावरून हा खून झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस करत आहे.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा