Pune crime|सिंहगड कॉलेजमधला २२ वर्षीय विद्यार्थी करायचा हाय टेक चोरी ; चोरीची पद्धत वाचून तुम्ही व्हाल हैराण

Pune crime|सिंहगड कॉलेजमधला २२ वर्षीय विद्यार्थी करायचा हाय टेक चोरी ; चोरीची पद्धत वाचून तुम्ही व्हाल हैराण
संग्रहित छायाचित्र.

पेमेंट करण्यासाठी तो एक ई-कॉमर्स वेबसाइटच्या यूपीआय पेमेंट सिस्टमचा वापर करीत होता. बार कोड स्कॅन केल्यानंतर तो रक्कम भरायचा आणि पिन टाकल्यानंतर सक्सेसफुल ट्रान्जॅक्शचा मेसेज दाखवून तेथून निघून जात होता. दुकानाचा मालक त्याच्या मागे लागू नये म्हणून तो ट्रान्जॅक्शन म्हणजे 20 ते 30 हजारांची खरेदी करीत होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 12, 2021 | 7:30 PM

पिंपरी – गुन्हेगारीच्या घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये हायटेक चोरीची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बीटेकच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या मुलगा ही हायटेक चोरी करत असल्याचे समोर आले आहे.निखिल जैन (वय 22) असे आरोपीचे नाव असून तो पुण्यात भाड्याच्या घर राहतो. फेक पेमेंट अॅपच्या माध्यमातून ज्वेलरी शॉपच्या मालकांची फसवणूक करत होती. या चोरीत खरेदी केल्यानंतर फेक अॅपच्या माध्यमातून पेमेंट केलेले दाखवायचा त्यानंतर तिथून निघून जायचा. अशा पद्धतीने अनेक ज्वेलरी शॉप मालकांची फसवणूक केली आहे.

असा करायचा फसवणूक?

आरोपी ज्या ज्वेलरी शॉपमध्ये जास्त गर्दी आहे, त्या दुकानांना टार्गेट करायचा. ज्वेलरी खरेदी केल्यानंतर तो यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे.  पेमेंट करण्यासाठी तो एक ई-कॉमर्स वेबसाइटच्या यूपीआय पेमेंट सिस्टमचा वापर करीत होता. बार कोड स्कॅन केल्यानंतर तो रक्कम भरायचा आणि पिन टाकल्यानंतर सक्सेसफुल ट्रान्जॅक्शचा मेसेज दाखवून तेथून निघून जात होता. दुकानाचा मालक त्याच्या मागे लागू नये म्हणून तो ट्रान्जॅक्शन म्हणजे 20 ते 30 हजारांची खरेदी करीत होता.

‘यू-ट्यूब’वर मिळाली आयडी

निखिल अभ्यासात हुशार आहे. मात्र तो आपल्या क्रेडिट कार्डचा गरजेपेक्षा जास्त वापर करीत होता. ज्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. त्यामुळे या गुन्ह्याकडे वळाला . या अॅपच्या माध्यमातून खोटं ट्रान्जॅक्शन केलं जातं. म्हणजे पाहताना असं वाटतं की, पैसे ट्रान्सफर झाले, मात्र ते समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जात नाही. आरोपी निखिलने देखील या पद्धतीचा वापर केला आणि अनेक ज्वेलरी मालकांकडून लाखोंचे दागिने खरेदी केले.  आरोपीजवळ 105 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह महागडा मोबाइल फोन आणि 1 स्कूटर सापडली आहे. याशिवाय आरोपीकडे पाच लाख रुपयांचे महागडे सामान देखील सापडले आहेत. या सर्व वस्तू प्रॉक्सी पेमेंट अॅपच्या माध्यमातून खरेदी करण्यात आल्या होत्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें