AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime News | वर्ल्ड कप क्रिकेटच्या थरारात सट्टा जोरात, पोलिसांनी छापा टाकल्यावर बुकीने…

Pune Crime News | सध्या वर्ल्डकप क्रिकेटचा थरार सर्वत्र रंगला आहे. क्रिकेटचा हा थरार पाहण्यात क्रिकेटप्रेमी रंगले आहेत. त्याचवेळी सट्टा बाजारातील बुकी कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. पुणे पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला.

Pune Crime News | वर्ल्ड कप क्रिकेटच्या थरारात सट्टा जोरात, पोलिसांनी छापा टाकल्यावर बुकीने...
| Updated on: Oct 23, 2023 | 10:06 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. भारताच्या यशामुळे क्रिकेटप्रेमींचे प्रत्येक सामन्यावर लक्ष आहे. पुणे शहरात क्रिकेटचा थरार भारत-बांगलादेश सामन्यानंतर अधिकच रंगला. पुण्यात हा सामना झाला होता. आता क्रिकेट प्रेमी प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी बुकींनी सट्टा बाजार जोरात सुरु केला आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेला सट्टा बाजार पोलिसांनी उघड केला. यावेळी बुकीला अटक केली असून लाखोंची रक्कम जप्त केली आहे.

कोणत्या सामन्याच्या वेळी झाली कारवाई

पिंपरी कॅम्प आणि आसपासच्या परिसरात सट्टाचा बाजार अनेक स्पर्धेदरम्यान भरत असतो. क्रिकेट सामने, फुटबॉल, आयपीएल प्रिमीअर लीगमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल पिंपरी चिंचवडमधील सट्टा बाजारात होते. आता नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कोट्यावधींचा सट्टा पिंपरीत सुरु होता. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकला.

४० लाखांची रक्कम जप्त

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या छाप्यामध्ये बुकी दिनेश शर्मा याला पोलिसांनी अटक केली. दिनेश शर्मा यांच्या बेटिंगच्या घटनास्थळावर पोलिसांनी छापा टाकला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चाळीस लाखांची रक्कम दिसत आहे. तसेच दिनेश शर्मा पोलिसांसमोर गयावया करत असताना दिसत आहे.

ऑनलाईन पद्धतीने सुरु होता सट्टा

ऑनलाइन जगात क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू या अ‍ॅपवर अनेकांना मोठ्या रक्कमेच आमिष दाखवले जाते. इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात सट्टेबाजी या अ‍ॅपवर सुरु होती. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील एका घरावर छापा टाकला. त्यानंतर दिनेश शर्मा याने यापुढे सट्टा खेळणार नाही. माफ करा. असे म्हणत असल्याचे दिसत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी त्याला अटक केली. घटनास्थळावरुन चाळीस लाख ऐंशी हजारांची रोकड जप्त केली आहे.

आणखी काही जणांना अटक होणार

सट्टा प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सट्टेबाजारावर कारवाई होत आहे. परंतु काही दिवसांत पुन्हा नवीन टोळी निर्माण होते. त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा नवीन आव्हान निर्माण होत असते.

कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार पोपट हुलगे यांनी केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.