AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune cyber crime |रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या जितेन गजरियावर पुण्यात गुन्हा दाखल

ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट करून त्याने ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pune cyber crime |रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या  जितेन  गजरियावर पुण्यात गुन्हा दाखल
रश्मी ठाकरें
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 12:45 PM
Share

पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या सोशल मीडियाचे काम पहाणाऱ्या पदाधिकारी जितेन गजरिया विरोधात पुण्यातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तक्रारीनंतर रोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.

ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट

जितेन गजरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेन गजरिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट करून त्याने ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

काय केले होते ट्विट

भाजपच्या जितेन गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi) म्हटले होते. यामुळेच वाद निर्माण झाला होता, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले. जितेन गाजरीया यांना ताब्यात घेतल्यानंतर गजारियांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

नोरा फतेही आणि गुरू रंधावाच्या गाण्यावर थिरकली शाळकरी मुलगी, 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय Naach Meri Raniचा हा Video

Kishori Pednekar | नागरिकांनी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई : किशोरी पेडणेकर

Binge Watch | ‘पुष्पा’ ते ‘द टेंडर बार’ पर्यंत, पाहा या आठवड्यात OTT वर काय काय प्रदर्शित होणार?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.