AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीची आत्महत्या, भावाने पत्नीची हत्या करुन विष प्राशन केले; वाचा नेमकं असं काय घडलं?

पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहिण माया सातव अशी तिघांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे.

बहिणीची आत्महत्या, भावाने पत्नीची हत्या करुन विष प्राशन केले; वाचा नेमकं असं काय घडलं?
crime
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 9:01 PM
Share

पुणे : कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील दोघांची आत्महत्या आणि एकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचले आहे. या घटनेचा अधिक तपास आता शिरूर पोलीस करत आहेत

काय घडलं नेमकं?

पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहिण माया सातव अशी तिघांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. पती समीर, पत्नी वैशाली आणि बहिण माया यांच्यात रात्री कोणत्या तरी कारणाने वाद झाला. या वादानंतर बहिण माया सातव हिने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती भाऊ समीरला मिळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी वाद निर्माण झाला. या वादातून समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन मग विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

समीर तावरेची प्रकृती चिंताजनक

कौटुंबिक वादानंतर माया सातव या बुधवारपासून बेपत्ता होत्या. कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत सापडला. बहिणीच्या आत्महत्येची बातमी मिळताच धक्का बसलेल्या समीरचा घरी येऊन बायकोशी वाद झाला. याच वादातून समीरने पत्नीवर हल्ला केला, यात ती जागीच ठार झाली. यानंतर समीरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान या तिघांमध्ये नेमका काय वाद झाला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

(brother killed his wife and drank poison himself, after his sister committed suicide)

इतर बातम्या

अमानुष ! पश्चिम बंगालमध्ये तृतीयपंथीयाचा कहर, नवजात अर्भकाला बंदी केले, उपासमारीने बालकाचा मृत्यू

पुणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; वनपाल व वनरक्षकाला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.