AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित पाटील प्रकरणात बड्या व्यक्तीच्या अटकेसाठी हालचालींना वेग

Lalit Patil | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सरकारी कर्मचारी आणि पोलिसांना अटक झाली आहे. आता या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ललित पाटील प्रकरणात बड्या व्यक्तीच्या अटकेसाठी हालचालींना वेग
Lalit Patil
| Updated on: Jan 15, 2024 | 9:24 AM
Share

पुणे, दि.15 जानेवारी 2024 | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात त्याला मदत करणारे पोलीस, रुग्णालयातील कर्मचारी आणि त्याचे मित्र आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला अनेक महिने ससून रुग्णालयात ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर संजीव ठाकूर अडचणीत आले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची तीन वेळा चौकशी केली आहे. या चौकशीत ललित पाटील याला रुग्णालयात राहण्यास मदत केल्याप्रकरणी डॉक्टर ठाकूर यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. यामुळे त्यांना अटक करण्याची तयारी सुरु केली आहे. परंतु डॉक्टर ठाकूर क्लास वन अधिकारी आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच डॉक्टर ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.

ललित पाटील असा राहिला रुग्णालयात

ललित पाटील याला ४ जून २०२३ रोजी टीबीच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला टीबी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाठीच्या दुखण्यासाठी अस्थिरोग विभागात तीन महिने उपचार सुरु होते. त्यानंतर डॉक्टर ठाकूर यांच्या सर्जरी युनिटमध्ये हर्निया उपचारासाठी ललित पाटील महिनाभर राहिला. त्यावेळी पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाला दोन कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्स ससून रुग्णालयाच्या गेटवर मिळाले.

चौकशीतून धागेदोरे डॉक्टर ठाकूर यांच्यापर्यंत

पोलिसांनी ससून रुग्णालयातील ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरु केल्यावर धक्कादायक माहिती मिळाली. हे ड्रग्स रॅकेट ससूनमध्ये उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील चालवत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला. या सर्व प्रकरणात १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले. चार पोलिसांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले.

या प्रकरणात ससूनमधील शिपाई महेंद्र शेवते आणि अस्थिरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण देवकांते यांना अटक झाली होती. त्यांच्या आणि इतर आरोपींच्या चौकशीतून थेट डॉक्टर ठाकूर यांच्यापर्यंत धागेदोरे पोहचले. त्यामुळे त्यांची तीन वेळा चौकशी झाली. त्यात त्यांनी ललित पाटील याला अधिक काळ आश्रय दिल्याचे पुरावे मिळाले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.