कामावरुन काढून टाकल्याचा राग, पुण्यात चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली

रणजीत जाधव

| Edited By: |

Updated on: Sep 18, 2021 | 7:25 AM

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली. ही घटना पुण्यातील भोसरीलगतच्या इंद्रायणीनगर येथे घडली. सोमवारी पहाटे चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवून दिली.

कामावरुन काढून टाकल्याचा राग, पुण्यात चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली
कार जाळली

Follow us on

पिंपरी चिंचवड : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली. ही घटना पुण्यातील भोसरीलगतच्या इंद्रायणीनगर येथे घडली. सोमवारी पहाटे चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवून दिली.

चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली

-चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. याबाबत कारच्या मालकीनीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे नाव आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

सविस्तर घटना काय?

आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी महिलेनं कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली.

(driver fire car Worth RS 22 lakh After fired from his job)

हे ही वाचा :

विकृती ! रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI